महिलेनं बनवली अशी बाग, आत जाताच माणूस होतो रोमॅन्टिक
नवी दिल्ली, 6 जुलै : जगभरात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या बागा आहेत. ज्याचं एक वेगळं महत्त्व आणि विशेष स्थान आहे. तुम्ही आत्तापर्यंत अनेक निरनिराळ्या बागांमध्ये गेला असाल मात्र तुम्ही अशा एखाद्या बागेविषयी ऐकलंय का? जिथे जाताच माणूस रोमॅन्टिक होतो. पहिल्यांदाच याविषयी ऐकत असाल तर तुम्हाला याविषयी आश्चर्य वाटणं सहाजिक आहे. मात्र ही बाग कुठे आहे आणि यामागे नेमकं काय कारण आहे याविषयी जाणून घेऊया. फ्रान्समध्ये राहणाऱ्या एका महिलेने अशी बाग बनवली आहे जिथे जाताच लोक रोमॅन्टिक होतात. या बागेचं नाव ग्रीक गॉडेस ऑफ़ लव यांच्यावरुन ऍफ्रोडाइट ठेवण्यात आहे. या बागेत आल्यावर अनरोमॅन्टिक माणसालाही रोमान्स वाटू लागतो. हे कामाच्या मागचा महिलेचा हेतू असा होता की बेडरुमच्या बाहेरही प्रेमाची भावना आणणे. आणि ती तिच्या उद्देशात यशस्वीही झाली.
फ्रान्समधील एका महिलेने प्रेम, सौंदर्य आणि आनंदाच्या ग्रीक देवीच्या नावावरून या बागेचे नाव ऍफ्रोडाइट ठेवले आहे. त्यामध्ये मादक सुगंध असलेली फुले लावण्यात आली आहेत. यासोबतच लैंगिकतेशी संबंधित अनेक प्रतीकेही पाहायला मिळतील. ही बाग रोमान्सच्या उद्देशाने बनवली आहे. त्याच्या आत अशी अनेक झाडे आणि फुले लावण्यात आली आहेत जी रोमान्सची भावना वाढवण्यासाठी वैज्ञानिकदृष्ट्या ओळखली जातात. एकाच बागेत सर्व झाडे लावल्यामुळे आतमध्ये खूप रोमँटिक वातावरण निर्माण होतं. ब्रम्हांडमध्ये घुमचो ‘हा’ आवाज, शास्त्रज्ज्ञांचा शोध थक्क करणारा ही रोमॅन्टिक बाग बनवणाऱ्या महिलेचं नाव डिझायनर सोफी कुनितल आहे. अंजीर, डाळिंबाचे झाड, लॅटरचे अनेक प्रकार, लॅव्हेंडर, जास्मिन, अफीम पॉपिस, कॅटनीप यांसारख्या वनस्पती त्याच्या आत लावल्या आहेत.