व्हायरल व्हिडीओ
नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी : एक काळ असा होता जेव्हा लोक फोटोग्राफरशिवायही लग्न उरकत होते. मात्र आजच्या जगात लोक प्रत्येक ठिकाणी फोटोग्राफर हवा असतो. आता तर लग्नाच्या पहिलेही फोटोग्राफर हवा असतो आणि नंतरही. सोशल मीडियाच्या जगामध्ये सर्वच गोष्टी ट्रेंडसाठी सुरु असून याचे फोटो, व्हिडीओदेखील सोशल मीडियावर समोर येतात. लग्नाच्या पहिले प्री-वेडिंग शूट करण्याचा ट्रेंड सध्या सुरु असून लोक वेगवेगळ्या प्रकारच्या आयडिया वापरुन हे शूट करत असतात. मात्र त्याची हटके आयडिया, वेगळी कल्पना कधी कधी त्यांच्या अंगलट येताना दिसते आणि फोटोग्राफरच्याही. सध्या सोशल मीडियावर प्री-वेडिंग शूटचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक मुलगी आणि काही फोटोग्राफर शेताच्या मधोमध प्री-वेडिंग शूट करत आहे. तरुणीने लेहंगा घातल्यामुळे तिला शेतातून चालायला अडचण होत आहे. ती फोटग्राफरला म्हणते की यामधून कशी चालणार? फोटोग्राफर तिला लेहंगा हातात घेऊन कसे चालायचे हे समजावून सांगत आहे, पण समजावून सांगण्याच्या नादात तो स्वतः धडामकन पडतो. हे दृश्य पाहिल्यानंतर वधूही जोरात हसते.
हा मजेदार प्री-वेडिंग शूट व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर कन्नू_मिश्राजी नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत 57 दशलक्ष म्हणजेच 5.7 कोटी वेळा पाहिला गेला आहे, तर 4 दशलक्ष म्हणजेच 40 लाखांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे. व्हिडीओवर नेटकरी खूप मजेशीर प्रतिक्रियाही देत आहेत.
दरम्यान, लग्नाच्या गडबडीत अशा अनेक घटना घडत असतात. कधी मजेशीर कधी विचित्र अशा घटना सोशल मीडियावर कायमच पहायला मिळतात. मित्र तर होणाऱ्या नवरी नवरदेवाची पूरपुरे मजा घेतात.