JOIN US
मराठी बातम्या / Viral / करायला गेला एक आणि घडलं भलतंच, लहान मुलाचा Video पाहून थांबणार नाही हसू

करायला गेला एक आणि घडलं भलतंच, लहान मुलाचा Video पाहून थांबणार नाही हसू

बॅटिंग खेळून झाल्यावर मुलानं स्वॅगमध्ये बॅट उडवली पण त्यानंतर जे घडलं ते पाहून थांबणार नाही हसू

जाहिरात

व्हायरल फोटो

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 26 जानेवारी : सोशल मीडियावर असे काही व्हिडीओ व्हायरल होत असतात, जे पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. कधी हे व्हिडीओ मनोरंजक तर कधी धक्कादायक असतात. बऱ्याचदा लोक रात्रीच्या वेळी आपला दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी काही मनोरंजक व्हिडीओ पाहातात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो पाहून तुमच्या चेहऱ्यावर हसु उमटेल. एक लहान मुलगा बॅटिंगची प्रॅक्टिस करत असताना त्याच्यासोबत असं काही घडलं की बस्स… हे ही पाहा : तरुणाची अजब कला, शब्दापासून बनवला सुंदर ताजमहाल, Video Viral खरंतर हा लहान मुलगा एका बॅट सोबत खेळत आहे. तो एकटाच खेळतोय. हा मुलगा आधी फक्त बॅट फिरवण्याची एक्शन करत असतो. तो एकटाच प्रॅक्टिस करत असतो. इथपर्यंत सगळं ठिक सुरु होतं. पण खरी गंमत तेव्हा येते. जेव्हा हा चिमुकला त्याचा खेळ थांबवून घरी जायला निघतो.

संबंधित बातम्या

आपलं खेळून झाल्यावर या मुलाने आपल्या हातातील बॅट स्टाईलमध्ये वर उडवली आणि पुढे चालू लागला. त्याला वाटलं त्याच्या मागे कुठेतरी ती बॅट पडेल. पण तसं न होता ती बॅट थेट त्याच्याच डोक्यात पडते. ज्यानंतर तो मुलगा आपलं डोकं चोळू लागतो. हे पाहाताना फारच मजेदार वाटत आहे. पण आपण अंदाजा लगावू शकतो की या तरुणाला किती जोरात लागलं असेल. हे ही पाहा : आधी स्टाईल मारली मग स्कूटीवरुन धपकन पडली तरुणी, Video Viral हा व्हिडीओ cctv ediots नावाच्या ट्वीटर अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. ज्याला लोकांनी रिट्वीट देखील केलं आहे. तर हा व्हिडीओ असंख्यवेळेस पाहिला गेला आहे. हा व्हिडीओ खरंच तुमच्या चेहऱ्यावर हसु उमटवेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या