JOIN US
मराठी बातम्या / Viral / iPhone चोरताना चेहरा लपवण्यासाठी डोक्यात घातला पुठ्ठ्याचा बॉक्स; पण ऐनवेळी चोराची भलतीच फजिती, CCTV मध्ये कैद

iPhone चोरताना चेहरा लपवण्यासाठी डोक्यात घातला पुठ्ठ्याचा बॉक्स; पण ऐनवेळी चोराची भलतीच फजिती, CCTV मध्ये कैद

चोरीच्या वेळी ओळख लपवण्यासाठी चोराने पुठ्ठ्याच्या बॉक्सच्या मदतीनं चेहरा झाकला. पण हा बॉक्स खाली पडल्यानं चोराचा चेहरा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला.

जाहिरात

iPhone चोरताना फजिती

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 07 जून : चोर हे चोरी करण्यात अगदी पटाईत असतात. कित्येकवेळा मोठमोठ्या चोऱ्या करणारे चोर लवकर पकडले जात नाहीत. मात्र, कधीकधी अशीही वेळ येते, जेव्हा चोर स्वतःच्या चुकीमुळे पकडला जातो. अशीच एक घटना नुकतीच घडलीय. एका चोर आयफोनची चोरी करण्यासाठी दुकानात शिरला. चोरी करताना स्वतःचा चेहरा कोणाला दिसू नये, म्हणून चोराने स्वतःचा चेहरा एका बॉक्सने झाकला. पण चोरी करताना असं काही घडलं की, लपून राहण्याचा त्याचा हेतू साध्य झाला नाही. सध्या या प्रकाराचा व्हिडिओ वेगानं व्हायरल होत आहे. ‘झी न्यूज हिंदी’ ने याबाबत वृत्त दिलंय. आयफोनची अनेकांना प्रचंड क्रेझ असते. तो मिळवण्यासाठी अनेकजण प्रयत्न करतात. पण नुकतीच घडलेली आयफोन चोरीची घटना पाहिल्यानंतर तुम्हाला तुमचं हसू आवरता येणार नाही. मियामी गार्डन्समधील मोबाईल दुरुस्तीच्या दुकानात एक विचित्र पण मजेदार घटना घडली. चोरीच्या वेळी ओळख लपवण्यासाठी चोराने पुठ्ठ्याच्या बॉक्सच्या मदतीनं चेहरा झाकला. पण हा बॉक्स खाली पडल्यानं चोराचा चेहरा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. Apple Store मध्ये चोरी करून पळत होता, दुसऱ्या मजल्याहून पडला अन् नको ते घडलं..VIDEO नेमकं काय घडलं? मियामी गार्डन्समधील एका दुकानात शनिवारी (3 जून 2023) पहाटे चारच्या सुमारास चोरी करण्याच्या उद्देशानं एक चोर दुकानात शिरला. त्यानंतर त्याने आयफोन चोरण्यासाठी दुकानातील काउंटरची काच फोडली. पण ही काच फोडताना त्याने स्वतःच्या चेहरा झाकण्यासाठी डोक्यावर घातलेला पुठ्ठा बॉक्स खाली पडला, व चोराचा चेहरा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. या चोरीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. असा पकडला चोर दुकानाचा मालक जेव्हा दुकानात आला, तेव्हा त्याला दुकानात चोरी झाल्याचं लक्षात आलं. त्यानंतर त्याने सीसीटीव्ही फुटेज तपासलं. तेव्हा सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्याला चोराचा चेहरा दिसला. त्यानंतर त्याने त्याचं दुकान असलेल्या शॉपिंग प्लाझासह आजूबाजूच्या दुकानादारांना संबंधित चोराबाबत माहिती दिली. त्यातच दुकानदाराला आयफोनची चोरी करण्यासाठी आलेला चोर हा त्याच परिसरात असणाऱ्या एका दारुच्या दुकानात आल्याची माहिती मिळाली. ही माहिती त्याने पोलिसांना दिली, व पोलिसांनी तत्काळ संबंधित चोराला सापळा रचून अटक केली. दरम्यान, दुकान मालकाच्या म्हणण्यानुसार चोराने 19 आयफोनसह एकूण 15 हजार डॉलर म्हणजेच सुमारे 12 लाख रुपये किंमतीचा माल चोरून नेला. पोलिसांनी आता चोराला पकडले असून पुढील तपास सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या