JOIN US
मराठी बातम्या / Viral / VIDEO - मित्रांनी नवरीबाईला दिलं असं Wedding gift; पाहताच नवरदेवाच्या चेहऱ्याचा रंगच उडाला

VIDEO - मित्रांनी नवरीबाईला दिलं असं Wedding gift; पाहताच नवरदेवाच्या चेहऱ्याचा रंगच उडाला

लग्नात नवरीला असं गिफ्ट मिळालं आहे, जे पाहून सर्वजण हैराण झाले.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 डिसेंबर : लग्नामध्ये (Wedding gift) मित्रमैत्रिणी नवरी-नवऱ्याला छेडण्याची एक संधी सोडत नाही. हल्ली तर अगदी गिफ्ट देतानाही मस्करी केली जाते. कोण काय गिफ्ट (Wedding gift) देईल सांगू शकत नाही. याआधी अशा विचित्र गिफ्टचे बरेच व्हिडीओ व्हायरल (Wedding Viral Video) झाले आहेत. महागाईच्या काळात कुणी कांदे-बटाटे दिली, कुणी भाजीपाला दिला. तर मजा म्हणून कुणी बाळाची दुधाची बाटली,  लहान मुलांची खेळणी, पाळणा असंकाहीतरी दिलं. पण सध्या सोशल मीडियावर (Social Media) अशाच एका लग्नातील विचित्र गिफ्टचा (Weird Gift) व्हिडीओ व्हायरल (Viral video) होतो आहे. लग्नात नवरीला असं गिफ्ट मिळालं आहे, जे पाहून नवरा-नवरी हैराण झालेच. पण गिफ्ट पाहून तुम्हाला मात्र हसू आवरणार नाही. तुम्ही पोट दुखेपर्यंत हसाल (Funny Video). ट्रेंडिग दुल्हनिया इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओत पाहू शकता वर आणि वधू स्टेजवर खुर्चीवर बसले आहेत. त्यांच्या आजूबाजूला त्यांचा मित्र परिवार आहे. नवरीच्या शेजारी बसलेला नवरदेवाचा मित्र नवरीला गिफ्ट देतो. तो आपल्याच हातांनी ते गिफ्ट खोलताना दिसतो.

संबंधित बातम्या

बॉक्सधील गिफ्ट जेव्हा बाहेर काढलं जातं, तेव्हा सर्वजण हैराण होता. गिफ्ट पाहताच नवरीबाईच्या चेहऱ्याचा रंग खुलतो तर नवरदेवाच्या चेहऱ्याचा रंग मात्र उडतो. **हे वाचा -** मेहुणी जोमात दाजी कोमात! नवरीबाईच्या बहिणींचा प्रताप पाहून नवरदेवाला फुटला घाम कारण गिफ्ट म्हणून नवरीला चक्क कपडे धुण्याचं धुपाटणं देण्यात आलं आहे. गिफ्ट पाहून नवरीबाईला हसू आवरत नाही. किंबहुना तिला खूप आनंद होतो. तिच्या आनंदाला पारावरच राहत नाही. ती धुपाटणं हातात घेऊन लग्नात स्टेजवर सर्वांसमोरच नवऱ्याच्या दिशेने करतानाही दिसते. या धुपाटण्यासोबत नवरीच्या मांडीवर लाटणं आणि रवीही पाहून शकता. साहजिकच नववधूच्या हातात हे असं गिफ्ट पाहून नवऱ्याची काय अवस्था झाली असेल, याची कल्पनाही तुम्हाला आली असेल. तसा तोसुद्धा हे विचित्र गिफ्ट पाहून हैराण झालाच आहे. त्याच्या चेहऱ्याचा रंगच उडाला आहे. पण तरी आपलं लग्न म्हणून चेहऱ्यावर हसू आणताना दिसत आहे. हे वाचा -  आई करत होती दुसरं लग्न; मुलीनं फोटो शेअर करत दिलं असं कॅप्शन की पाणावतील डोळे गिफ्ट पाहून नवरा-नवरीची अवस्था काहीही झालेली असूदे. पण तुम्हाला मात्र नक्कीच मजा आली असेल. तुम्ही तर पोट धरून हसला असाल. कदाचित तुम्हालाही एखाद्याच्या लग्नात काहीतरी हटके गिफ्ट देण्याची आयडिया या निमित्ताने मिळाली असेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या