गेल्या 7 वर्षापासून अनवाणी चालतेय महिला
नवी दिल्ली, 24 जुलै: अनेक आजारांपासून वाचण्यासाठी लोक विविध उपाय करताना दिसून येतात. डॉक्टरांकडून सल्ले घेऊन सकाळ संध्याकाळ त्यांचं पालन करतात. मात्र तरीही ते आजारी पडतात किंवा काहीतरी आजार होतो. एक महिला अशी आहे जिला गेल्या सात वर्षांपासून सर्दीदेखील झाली नाही. एवढंच नाही तर ती सात वर्षापासून विना चप्पल फिरतेय. हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया. गेल्या सात वर्षांपासून अनवाणी चालणाऱ्या महिलेचं नाव कॅटरिना शेनस्टन आहे. जी इंग्लंडमधील चेम्सफोर्ड एसेक्स येथे राहते. सात वर्षापूर्वी ती भारतात आली होती आणि काही लोकांना पाहून तिनं अनवाणी चालण्याचा निर्णय घेतला.
कतरिना म्हणाली, या निर्णयानं माझं आयुष्य बदललं. पूर्वी खूप थकवा यायचा, सांधे दुखायचे, आजारी पडायचे. पण आता तसं वाटत नाही. नेहमी उत्साह असतो. मला क्रॉनिक सिंड्रोम देखील होता, परंतु मी शूज घालणे बंद केल्यापासून मला कोणत्याही सांधे दुखीची समस्या नाही. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की तेव्हापासून आजपर्यंत मला सर्दीही झालेली नाही. तुम्ही पृथ्वीच्या जितके जवळ जाल तितकी तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते. पावसाच्या पाण्यात डझनभर गॅस सिलेंडर गेले वाहून, धक्कादायक Video समोर जेव्हा कतरिना विना चप्पल चालते तेव्हा तिला लोक बेघर समजतात. लोकांना वाटतं की मी खूप गरिब आहे. अनेकांनी तिला चप्पलही देण्याचं प्रयत्न केला मात्र तिनं लोकांना समजवलं की ती स्वतःच्या मनाने अनवाणी चालत आहे. तिला या गोष्टीतून आनंद मिळतो. दरम्यान ही घटना सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.