JOIN US
मराठी बातम्या / Viral / Shocking! शौचालयातील फरशीवर ठेवलेलं कबड्डीपटूंसाठीचं जेवण; Viral Video मुळे खळबळ

Shocking! शौचालयातील फरशीवर ठेवलेलं कबड्डीपटूंसाठीचं जेवण; Viral Video मुळे खळबळ

स्विमिंग पुलच्या आवारात जेवण तयार केलं जात असून चेंजिंग रूम आणि टॉयलेटमध्ये राशन ठेवण्यात येत होतं. जेवण तयार केल्यानंतर ते शौचालयात ठेवण्यात आल्याचं व्हिडिओमध्ये दिसतं. (Food Kept in Toilet)

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लखनऊ 20 सप्टेंबर : सहारनपूरच्या आंबेडकर स्पोर्ट्स स्टेडियममधील एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये राज्य कबड्डी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सहारनपूरमध्ये आलेल्या खेळाडूंसाठी तयार केलेलं जेवण स्टेडियमच्या टॉयलेटमध्ये ठेवलेलं पाहायला मिळालं. स्पर्धेचं उद्घाटन शुक्रवारी झालं असून, स्टेडियममध्येच खेळाडूंच्या राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. शिर्डीतील शिक्षकाचं शाळकरी मुलींसोबत गैरकृत्य, प्रकार उघडकीस येताच पालकांनी दिला चोप स्विमिंग पुलच्या आवारात जेवण तयार केलं जात असून चेंजिंग रूम आणि टॉयलेटमध्ये राशन ठेवण्यात आलं आहे. जेवण तयार केल्यानंतर ते शौचालयात ठेवण्यात आलं. टॉयलेटच्या फरशीवर भात आणि पुरीचे थर कागदावर पडलेले व्हिडिओमध्ये दिसतात. खेळाडूंना व्यवस्थित चांगलं अन्नही मिळत नसल्याची धक्कादायक परिस्थिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली.

संबंधित बातम्या

यूपी क्रीडा निदेशालयाच्या देखरेखीखाली यूपी कबड्डी असोसिएशनतर्फे डॉ. भीमराव आंबेडकर क्रीडा स्टेडियमवर राज्यस्तरीय सब-ज्युनियर मुलींची स्पर्धा आयोजित केली जात आहे. ज्यामध्ये 16 विभागातील संघ आणि एक क्रीडा वसतिगृहाचे एकूण 17 संघ सहभागी होत आहे. याठिकाणी हा प्रकार घडला. कामावरुन काढल्याचा असा काढला राग! औरंगाबादमध्ये बिल्डरसोबत घडलं भयानक कृत्य दुसरीकडे, क्रीडा अधिकारी अनिमेश सक्सेना यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. या संपूर्ण प्रकरणावर खुलासा करताना त्यांनी सांगितलं की, भात निकृष्ट दर्जाचा आला होता. जो स्वयंपाक करताना नीट शिजला नव्हता. अशा स्थितीत हा तांदूळ तात्काळ दुकानात परत पाठण्यात आला आणि नवीन तांदूळ मागण्यात आला. यासोबतच स्टेडियमच्या काही भागाचं बांधकाम सुरू असल्याने काहीसा गोंधळ उडाला, असं ते म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या