JOIN US
मराठी बातम्या / Viral / OMG! पाण्यात जिवंत फिरताना दिसला डोकं कापलेला मासा; व्यक्तीने हात लावताच...; पाहा VIDEO

OMG! पाण्यात जिवंत फिरताना दिसला डोकं कापलेला मासा; व्यक्तीने हात लावताच...; पाहा VIDEO

डोक्याशिवाय पाण्यात जिवंत फिरणाऱ्या या माशाचा व्हिडीओ पाहून सर्वांना धक्का बसला आहे.

जाहिरात

डोक्याशिवाय जिवंत मासा.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 नोव्हेंबर : तुम्हाला मासे खायला आवडत असतील किंवा खायला नाही पण पाळायला आवडत असतील तर तुम्हाला वेगवेगळ्या माशांबाबत नक्कीच माहिती असेल. पण सध्या सोशल मीडियावर अशा माशाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जो आजवर तुम्ही कधीच पाहिला नसेल. किंबहुना या माशाला पाहून तुम्हालाही धक्का बसेल. कारण या माशाला डोकं किंवा जबडाच नाही आणि तो चक्क जिवंत आहे. या विचित्र माशाच्या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सामान्यपणे मासे पाण्यात राहतात. त्यांना पाण्याबाहेर काढलं तर काही वेळ ते तडफडतात आणि त्यांचा मृत्यू होतं. माशांचं डोकं कापला की ते जिवंत राहत नाही हे तुम्हीही पाहिलं असेल. पण या व्हिडीओतील माशाने मात्र सर्वांना शॉक दिला आहे. कारण त्याचं डोकं नाही पण तरी तो जिवंत आहे आणि पाण्यात पोहोतोही आहे. हे वाचा -  आपल्याच पिलांना खातात सिक्लिड मासे, माशांमधल्या या विचित्र वर्तनाबाबत शास्त्रज्ञांचं संशोधन व्हिडीओत तुम्ही पाहू शकता पाण्यात एक मासा पोहोताना दिसतो आहे. पण त्याचं डोकं नाही आहे. डोकं कापल्यासारखं आहे. पण डोकं नसलं तरी तो अगदी सहजरित्या पाण्यात पोहोतना दिसतो आहे. किनाऱ्यावर आल्यावर या माशाला आपल्या कॅमेऱ्यात कैद करणारी व्यक्ती त्या माशाच्या पाठीला बोट लावते तसा हा मासा मागे हटतो. @OTerrifying ट्विटर अकाऊंटवर हा शॉकिंग व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. एका युझरने असाच आपला अनुभवही सांगितलं आहे. त्याने मासा पकडल्यानंतर त्याचं डोकं कापलं. आता हा मासा मृत होईल असं त्याला वाटलं पण तो मासा जिवंतच होता. तर एका युझरने हा अगांथा मासा असल्याची माहिती दिली आहे. या माशाला जबडा नसतो. त्यामुळे आपल्या तोंडाने ते खाणं गिळतात. काहींनी हा तो मासा नसल्याचं म्हटलं आहे.

संबंधित बातम्या

तुम्हाला या माशाला पाहून काय वाटलं किंवा तुम्हाला या माशाबाबत काही माहिती असेल तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या