नवी दिल्ली 03 जून : कधी कोणासोबत काय दुर्घटना घडेल, हे कोणीच सांगू शकत नाही. अनेकदा आपण अगदी सुरक्षित ठिकाणी असतानाही अशा काही दुर्घटना घडतात, ज्या सर्वांनाच आश्चर्यचकित करतात. आपण विचारही केलेला नसतो अशा घटना घडून जातात. यातील काही घटना इतक्या अजब असतात की त्यांच्याबद्दल जाणूनही सगळे थक्क होतात. अशीच एक घटना थायलंडच्या बँगकॉकमधून समोर आली आहे. या घटनेत एक मासा अचानक पाण्यातून बाहेर आला आणि थेट मासेमारी करणाऱ्या व्यक्तीच्या तोंडात त्याने उडी घेतली. इतकंच नाही तर हा मासा या व्यक्तीच्या गळ्यापर्यंत पोहोचला. पुढे हा मासा गळ्यातच अडकला (Fish Jumped of into Man’s Throat). ब्रेकअपनंतर तरुणाचं धक्कादायक कृत्य; एक्स गर्लफ्रेंडचं अपहरण करत केलं विचित्र काम न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, एक मासेमारी करणारा व्यक्ती मासे पकडण्याकरता पाण्यात जाळं टाकून बसलेला होता. इतक्यात एका माशाने पाण्यातून बाहेर येत या व्यक्तीवर हल्ला केला. हा मासा थेट या व्यक्तीच्या तोंडात गेला आणि गळ्यात अडकून बसला. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना 22 मे रोजी थायलंडच्या फल्थलुंग येथे घडली. मिळालेल्या माहितीनुसार, 5 इंचाचा हा मासा गळ्यात अडकल्याने या व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तात्काळ या व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात आलं. सुरुवातीला त्याची अवस्था पाहून डॉक्टरांनाही काही समजेना. या व्यक्तीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं की अशाप्रकारची प्रकरणं खूप कमी पाहायला मिळतात आणि त्यांनी असं प्रकरण आजपर्यंत पाहिलं नव्हतं. सासरी जाणाऱ्या लेकीवर थुंकतो बाप; इथं लग्नानंतर विचित्र पद्धतीने होते मुलीची पाठवणी डॉक्टरांनी अनेक प्रयत्नानंतर या व्यक्तीचा जीव वाचवला आणि त्याच्या इतर अवयवांनाही इजा होऊ दिली नाही. असंच आणखी एक प्रकरण याच वर्षी थायलंडमधून समोर आलं होतं. यात एक व्यक्ती पाण्यात पोहत असताना एक मासा अचानक त्याच्या तोंडात शिरला. या व्यक्तीलाही गंभीर अवस्थेत रुग्णलायत दाखल करण्यात आलं होतं.