JOIN US
मराठी बातम्या / Viral / Optical Illusion Photo : या माशात लपलेत 2 पक्षी; 5 सेकंदांमध्ये शोधून दाखवा

Optical Illusion Photo : या माशात लपलेत 2 पक्षी; 5 सेकंदांमध्ये शोधून दाखवा

5 सेकंदांमध्ये हे पक्षी ज्यांना शोधता येतील, त्यांची निरीक्षणशक्ती उत्तम असेल यात शंका नाही.

जाहिरात

फोटोत लपलेला पक्षी शोधा.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 07 जुलै : ऑप्टिकल इल्युजन म्हणजेच दृष्टिभ्रम निर्माण करणारी चित्रं किंवा फोटो डोकं खाजवायला लावतात. डोळ्यांना चटकन दिसणार नाही, अशा पद्धतीनं ही चित्रं तयार केलेली असतात. तर्क लावून शोधण्याचा प्रयत्न केला, तर लपलेल्या गोष्टी शोधता येतात. बुद्धीला चालना देण्यासाठी अशी दृष्टिभ्रमाची चित्रं खूप महत्त्वाची ठरतात. सोशल मीडियावर दृष्टिभ्रमाचे अनेक फोटोज किंवा चित्रं व्हायरल होतात. अनेक जण ती रहस्यं शोधायचा प्रयत्न करतात; मात्र फारच थोड्या जणांना ती शोधता येतात. सध्या व्हायरल होणाऱ्या चित्रामध्ये लपलेले 2 पक्षी वाचकांना शोधायचे आहेत. 5 सेकंदांमध्ये हे पक्षी ज्यांना शोधता येतील, त्यांची निरीक्षणशक्ती उत्तम असेल यात शंका नाही. ऑप्टिकल इल्युजनची कोडी म्हणजे डोळ्यांना सराव असतो. बारीकसारीक तपशील टिपणं, एकाग्रता वाढवणं, यासाठी अशी कोडी महत्त्वाची असतात. सर्जनशीलतेला वाव मिळेल, अशीही काही कोडी असतात. केवळ एक टक्का जणच हे कोडं सोडवू शकतील. ऑप्टिकल इल्युजनचं हे चित्र पाण्यातल्या डॉल्फिनचं आहे. निळ्याशार पाण्यात एक डॉल्फिन उसळी मारत एका माशाला पकडत असल्याचं चित्रात दिसतंय. त्या वेळी त्या माशाच्या तोंडातून पाण्याचे थेंब बाहेर पडत आहेत. दूरवर एक बोटही त्या पाण्यात चालताना दिसते आहे. वरकरणी हे चित्र पाण्यातल्या डॉल्फिनचं वाटत असलं, तरी या चित्रात 2 पक्षी लपलेले आहेत. या पक्ष्यांना बेमालूमपणे चित्रातल्या आकारांमध्ये मिसळलेलं आहे. त्यामुळे कोड्याचं उत्तर शोधण्यासाठी चित्र काळजीपूर्वक पाहिलं पाहिजे. केवळ 5 सेकंदांमध्ये उत्तर शोधणं ही सोपी गोष्ट नाही. तुमची बुद्धिमत्ता चांगली असेल, तर कदाचित तुम्ही हे कोडं सोडवू शकाल. काही वेळा कोड्यांची उत्तरं आपली बुद्धिमत्ता आणि तर्काच्या पलीकडे असतात. एक छोटीशी मेख त्यामागे असते. ती लक्षात आली, तर संपूर्ण कोडं सोडवता येतं. तशाच प्रकारातलं हे कोडं आहे. त्याचं उत्तर सापडत नसेल, तर डॉल्फिनचं वाटणारं हे चित्र उलटं करून पाहा. म्हणजे कोड्याचं उत्तर मिळेल. डॉल्फिनच्या तोंडातला तो मासा प्रत्यक्षात एका पक्ष्याच्या तोंडात आहे व डॉल्फिनची शेपटी म्हणजे आणखी एक पक्षी आहे. एखाच्या वस्तूची, गोष्टीची डोळ्यांना फसवणारी प्रतिमा म्हणजेच दृष्टिभ्रमाचा उपयोग मानसशास्त्रातही केला जातो. मानवी स्वभावाचे, मानवी बुद्धीचे कंगोरे शोधण्यासाठी ही चित्रं मदत करतात. प्रत्येक चित्राकडे पाहण्याचे अनेक दृष्टिकोन असतात. त्यानुसार त्या त्या व्यक्तीचं स्वभाववैशिष्ट्य कळू शकतं. त्यामुळेच मानसोपचार तज्ज्ञांकडून दृष्टिभ्रमाच्या चित्रांचा वापर उपचारपद्धती म्हणून केला जातो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या