JOIN US
मराठी बातम्या / Viral / जेव्हा आपसात भिडले दोन हत्ती; रेसलिंगचा कधीही पाहिला नसेल असा VIDEO

जेव्हा आपसात भिडले दोन हत्ती; रेसलिंगचा कधीही पाहिला नसेल असा VIDEO

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की दोन हत्ती एकमेकांसमोर उभा आहेत. हे पाहून असं वाटतं, जणू ते एकमेकांना आव्हान देत आहेत. दरम्यान, एक हत्ती पुढे सरकतो आणि दुसऱ्याला मागे ढकलतो

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 07 फेब्रुवारी : हत्तीला पृथ्वीवरील सर्वात मोठा प्राणी मानलं जातं. हत्तींचं वजन हजारो किलोंमध्ये असतं. हा प्राणी आपल्या पायाखाली काहीही दाबून त्याचा विनाश करू शकतात. अनेकदा हा प्राणी माणसांसोबतही राहातो, मात्र शेवटी तो आहे जंगलीच. त्यामुळे हा प्राणी जंगलात राहिलेलंच अधिक चांगलं असतं आणि त्यांनाही कदाचित जंगलातच आवडतं. अनेकदा आपण हत्तींना कळपात पाहातो. ते एकमेकांसोबत राहाणंच पसंत करतात. मात्र, कधीकधी त्यांच्यातही लढाई होतेच. सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Elephant Fight Video) होत आहे. यात दोन हत्ती आपसात लढत असल्याचं दिसतं. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही नक्कीच रेसलिंग आठवेल. चोरी रोखण्यासाठी महिला चोरासोबत भिडली; भामट्याने हत्यार काढलं अन्.., Video व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की दोन हत्ती एकमेकांसमोर उभा आहेत. हे पाहून असं वाटतं, जणू ते एकमेकांना आव्हान देत आहेत. दरम्यान, एक हत्ती पुढे सरकतो आणि दुसऱ्याला मागे ढकलतो. यानंतर, तो पुन्हा एकदा थोडा मागे जातो आणि वेगात धावत येत दुसऱ्या हत्तीला जोरदार टक्कर मारतो. यानंतर दोघंही झाडाझुडपांपासून दूर जातात आणि थोडंसं उघड्यावर येतात. पुन्हा एकदा कुस्तीच्या शैलीत एकमेकांशी भिडतात. बराच वेळ त्यांची ही लढाई सुरूच राहाते. मात्र, व्हिडिओमध्ये शेवटी हे नाही दाखवलं गेलं की दोघांच्यात कोण जिंकलं.

संबंधित बातम्या

हत्तींचा हा अनोख रेसलिंग व्हिडिओ आयएफएस अधिकारी सुधा रमन यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन शेअर केला आहे. याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, ‘जंगलात दोन हत्तींची कुस्ती. हे वागणं सामान्य आहे. जर आपल्याला प्राण्यांची चांगली ओळख असेल, तर याचं कारणही समजू शकेल. हे वर्चस्वासाठीच भांडण असू शकतं, संसाधनांसाठी किंवा हार्मोनल बदलांमुळे ते एकमेकांशी भांडत असू शकतात.’ घातक सापाला पकडायला गेली महिला; अंगावर काटा आणणारा VIDEO VIRAL 1 मिनिट 36 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. तर शेकडो लोकांनी हा व्हिडिओ लाईकही केला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या. आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या