JOIN US
मराठी बातम्या / Viral / एका पालीची दहशत! भीतीने काम सोडून पळाले कर्मचारी; अख्खं ऑफिस रिकामं झालं

एका पालीची दहशत! भीतीने काम सोडून पळाले कर्मचारी; अख्खं ऑफिस रिकामं झालं

ऑफिसमध्ये पाल घुसताच खळबळ उडाली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अजमेर, 27 ऑक्टोबर : आपल्यापैकी बऱ्याच जणांना पालीची (Lizard) भीती वाटते. पाल समोर दिसताच आपण ओरडतो, तिच्यापासून दूरही पळतो (Wild lizard). पण कधी एका पालीमुळे ऑफिसमधील सर्वच्या सर्व कर्मचारी पळाल्याचं तुम्ही ऐकलं आहे का? (Fear of  lizard) तुम्हाला आश्चर्य वाटेल अशाच पालीच्या भीतीने अख्खं ऑफिस रिकामं झालं आहे (Wild lizard in office). राजस्थानमधील ही घटना आहे (Rajasthan wild lizard news). साप, अजगर, बिबट्या, वाघ, मगर यांच्याप्रमाणे एका पालीनेही (Wild goira lizard) दहशत माजवली. कोटा जंक्शनच्या रेल्वे पोस्ट विभाग कार्यालयात मंगळवारी अचानक एक पाल घुसली आणि खळबळ उडाली. तिला पाहताच कर्मचाऱ्यांना घाम फुटला. भीतीने कर्मचाऱ्यांनी काम बाजूला ठेवलं. काम सोडून ते ऑफिसमधून बाहेर पळाले. हे वाचापळायचं सोडून फोटो काढत राहिला, संतप्त गेंडा धावत आला आणि…; धडकी भरवणारा VIDEO अखेर पालीला पकडण्यासाठी स्नेक कॅचरला बोलवण्याच आलं. स्नेक कॅचर तिथं आले आणि त्यांनी त्या पालीला पकडलं. तेव्हा कुठे कर्मचाऱ्यांच्या जीवात जीव आला. या पालीला सुरक्षितपणे जंगलात पुन्हा सोडण्यात आलं. आता तुम्ही म्हणाला पालीची इतकी भीती का? तर ही पाल आपल्याला एरवी दिसणारी साधी पाल नव्हती तर ती एक जंगली पाल होती. जवळपास एक फूट लांबीची ही पाल. त्यामुळे तिचं रूप, आकार पाहूनच सर्वांना धक्का बसला. स्ननेक कॅचर  यांनी दिलेल्या माहितीनुसार ही पाल जंगली आहे पण विषारी नाही. ती खूपच शांत असते, तिला घाबरण्याचं तसं काही कारण नाही. जंगली पालीमुळे दहशत पसरल्याचं हे पहिलं प्रकरण आहे. हे वाचा -  OMG! चक्क मगरीच्या जबड्यातून बाहेर पडला तरुण; विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO स्ननेक कॅचर गोविंद शर्मा यांनी सांगितलं की, ही जंगली मेल गोयरा पाल आहे. ही विषारी नसते. तिच्यात फक्त बॅक्टेरिया असतात. ही उंदीर आणि बेडुक खाते. खराब मांस खाऊन ती आपलं पोट भरते. कारणाशिवाय ती कुणालाच हानी पोहोचवत नाही. ती चावली तर त्या भागावर जखम होते. त्यामुळे इन्फेक्शनही पसरू शकतं. पण तिच्या चावण्याने कुणाचा मृत्यू होत नाही. त्यामुळे अशा पालीला घाबरू नका आणि तिला मारूही नका.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या