JOIN US
मराठी बातम्या / Viral / बाप तो बापच! 6 महिने रात्रंदिवस मेहनत केली अन् मुलांना दिले 'हे' सुंदर गिफ्ट, पाहा VIDEO

बाप तो बापच! 6 महिने रात्रंदिवस मेहनत केली अन् मुलांना दिले 'हे' सुंदर गिफ्ट, पाहा VIDEO

आपल्या मुलांचे स्वप्न पूर्ण केल्याने अमित खूप खूश आहेत. तसेच त्यांची मुलेही खूप आनंदी आहेत.

जाहिरात

अमित यांनी बनविलेले वाहन

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

शाश्वत सिंह, प्रतिनिधी झांशी, 2 जुलै : वडील आपल्या मुलांच्या आनंदासाठी अनेक गोष्टी करतात, हे तुम्हाला माहित असेलच. यानंतर एका वडिलांनी ही बाब आणखी एकदा सिद्ध केली आहे. या व्यक्तीने आपल्या मुलांसाठी जुगाड इलेक्ट्रिक कार बनवली आहे. झाशी येथील रहिवासी असलेल्या अमित यांची ही कहाणी आहे. अमित हे व्यवसायाने शिंपी आहेत. झाशीच्या माणिक चौकात त्यांचे कुर्ता पायजमाचे दुकान आहे. त्यांना आपल्या मुलांसाठी इलेक्ट्रिक कार घ्यायची होती, पण ते शक्य झाले नाही. त्यांनी अनेक ठिकाणी भटकंती केली. त्यांना दुकानात जी काही वाहने मिळाली ती खूप महाग होती आणि त्यांचा पॉवर बॅकअप काही काळ होता.

मग यानंतर त्यांनी ठरवलं की मुलांसाठी स्वतः कार बनवायची. यासाठी त्यांनी यूट्यूबवर व्हिडिओ पाहण्यास सुरुवात केली. तसेच त्यांच्या काही मेकॅनिक मित्रांशीही त्यांनी चर्चा केली. अमित यांनी सांगितले की, त्यांनी ही कार बनवायला 6 महिने लागले. यानंतर या 6 महिन्यांच्या मेहनतीनंतर त्यांनी ही कार बनवली. यामध्ये ज्या काही वस्तू बसवण्यात आल्या आहेत, त्या त्यांनी जुगाडाच्या माध्यमातून जमा केल्या आहेत.

ही कार बनवण्यासाठी त्यांनी रात्रंदिवस काम केले. ही “जुगाड की गाडी” एकदा चार्ज केल्यावर 40 किमी धावते, असा दावा त्यांनी केला आहे. हे वाहन बनवायला खर्चही बराच कमी झाला आहे. आज त्यांची मुलंही याच गाडीतून शाळेत जातात. आपल्या मुलांचे स्वप्न पूर्ण केल्याने अमित खूप खूश आहेत. तसेच त्यांची मुलेही खूप आनंदी आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या