नवी दिल्ली 06 जानेवारी : देशातील सर्वात लोकप्रिय हेअर स्टायलिस्टमधील एक असलेल्या जावेद हबीब याचा एक धक्कादायक व्हिडिओ (Jawed Habib Shocking Video) नुकताच समोर आला आहे. यात जावेद हबीब हेअरकट करताना महिलेच्या डोक्यावर थुंकताना दिसतो. एका ट्रेनिंग क्लासदरम्यान जावेद हबीब एका महिलेच्या डोक्यावर हे म्हणत थुंकला (Jawed Habib Spitting on Woman’s Hair) की हिचे केस खूप ड्राय आहेत. मस्करीत तो हेदेखील बोलतो, की त्याच्या थुंकीमध्ये ताकद आहे.
व्हिडिओमध्ये जावेद हबीब ज्या महिलेच्या केसांवर थुंकला, ती बागपतच्या बडौत येथील असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र हा व्हिडिओ नेमका किती तारखेचा आहे, हे समोर आलेलं नाही.व्हिडिओमध्ये एक महिला सलूनमध्ये खुर्चीवर बसलेली दिसते. ट्रेनिंग सेमिनारमध्ये उपस्थित लोकांना टिप्स देताना जावेद हबीब हलगर्जीपणा करत महिलेच्या डोक्यावरील केसांमध्ये थुंकतो आणि म्हणतो, की जर पाण्याची कमी असेल तर या थुंकीत ताकद आहे.
हे पाहून तिथे उपस्थित काही लोक हसतात आणि टाळ्या वाजवतात. मात्र काही लोकांना त्याचं हे कृत्य अजिबातही आवडलं नाही. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर व्हिडिओमधील महिलाही आपला अपमानास्पद अनुभव शेअर करण्यासाठी पुढे आली. एका व्हिडिओमध्ये तिने म्हटलं की ‘जर सार्वजनिकरित्या ते डोक्यात थुंकत असतील तर आपल्या प्रोडक्टमध्ये ते काय वापरत असतील हे आपण सांगूच शकत नाही. जावेद हबीब सलूनमध्ये केवळ मुर्ख व्यक्तीच केस कापेल. मी गल्लीतल्या छोट्या दुकानात माझे केस कापेल, पण कधीच जावेद हबीबच्या शॉपमध्ये जाणार नाही’
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून सगळेच हैराण झाले आहेत. ट्विटरवर हा व्हिडिओ @pb3060 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ 1 लाख 44 हजारहून अधिकांनी पाहिला आहे.