JOIN US
मराठी बातम्या / Viral / पोपट शोधून द्या आणि इतके हजार जिंका; पक्षाच्या आठवणीने व्याकूळ मालकाने शहरभर लावले पोस्टर्स

पोपट शोधून द्या आणि इतके हजार जिंका; पक्षाच्या आठवणीने व्याकूळ मालकाने शहरभर लावले पोस्टर्स

पोपटाचा मालक आणि मालकीण यांची रडून रडून अवस्था वाईट झाली आहे. मालक शहरात फिरत असून भिंतींवर पोस्टर्स चिकटवत आहे. तर दुसरीकडे घरातील पिंजऱ्यासमोर मालकीण पोपटाच्या येण्याची वाट पाहत बसलेली असते

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 07 मे : आतापर्यंत तुम्ही लहान मुलं आणि गतिमंद लोकं हरवल्याच्या जाहिराती शहराच्या भिंतींवर पाहिल्या असतील. पण बिहारच्या गया या धार्मिक शहरामध्ये एका कुटुंबाचा लाडका पोपट गायब झाला (Pet Parrot Goes Missing). यामुळे त्यांच्या आयुष्यातील सुख-शांती नाहीशी झाली आहे आणि त्यांची झोपही उडाली आहे. पोपटाचा मालक आणि मालकीण यांची रडून रडून अवस्था वाईट झाली आहे. मालक शहरात फिरत असून भिंतींवर पोस्टर्स चिकटवत आहे. तर दुसरीकडे घरातील पिंजऱ्यासमोर मालकीण पोपटाच्या येण्याची वाट पाहत बसलेली असते (Family Started Search Campaign for Pet Parrot). गयाच्या कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील पिपरपाटी रोड येथील रहिवासी श्याम देव प्रसाद गुप्ता आणि पत्नी संगीता गुप्ता आपला पोपट गायब झाल्यामुळे चिंतेत आहेत. पोपट शोधणाऱ्याला ५१०० रुपयांचं बक्षीसही या दाम्पत्याने जाहीर केलं आहे. आता पोपटाचे पोस्टर लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. वरमाळेचा कार्यक्रम झाला अन् फेरे सुरु होतानाच नवरीला समजलं नवरदेवाचं सत्य, मंडपातच मोडलं लग्न पक्षाला शोधण्यासाठी घराबाहेर आणि बाजारपेठेत पोपटाचे फोटो असलेले पोस्टर भिंतींवर चिकटवण्यात आले आहेत. ज्या व्यक्तीला तो सापडेल त्याला 5100 रुपये रोख बक्षीस दिले जाणार आहे. पोपटाच्या मालकाने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे महिनाभरापूर्वी 5 एप्रिल रोजी हा पोपट घरातून अचानक उडून गेला, बराच शोध घेऊनही तो आजतागायत सापडला नाही. घरातील लोक त्याचा सतत शोध घेत आहेत. अनेकदा आजूबाजूच्या झाडांवर त्याचा शोध घेतला तसंच खास आवाजात त्याला हाक मारण्याचा प्रयत्न करूनही पोपट परतला नाही. यानंतर पोपटाच्या मालकाने शहरातील भिंतींवर पोस्टर चिकटवून लोकांना पोपट शोधण्याचं आवाहन केलं. यासोबतच हरवलेल्या पोपटाचं छायाचित्र व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर टाकून त्याबाबत माहिती देण्याचं आवाहन केलं. रूममध्ये दिसलं असं काही की भडकली महिला; हॉटेलकडून घेतली 76 लाखांची भरपाई पोपटाच्या मालकिणीने सांगितलं की, ती सुमारे 12 वर्षांपासून पोपटाची काळजी घेत होती, तिने त्याचं संगोपन केलं. पण 5 एप्रिल रोजी अचानक तो घरातून कुठेतरी गायब झाला. सगळे लोकांच्या घरी जाऊन पोपटाचा शोध घेत आहे. मालकिणीने म्हटलं की ज्यांनी कोणी आमचा पोपट नेला आहे, त्यांनी तो परत आणून द्यावा. त्याच्या बदल्यात आम्ही त्यांना २-३ पोपट खरेदी करून देऊ. महिलेनं सांगितलं की ‘तो केवळ पोपट नसून माझ्या घरातील सदस्य आहे. आम्ही एकत्र उठायचो, बसायचो आणि खायचो प्यायचोही. पण जेव्हापासून पोपट गायब झाला, तेव्हापासून आमची झोप उडाली आहे. पोपटाच्या मालकाने त्याला प्रेमाने पोपो असं नाव दिल्याचं सांगितलं. पण आता हा पोपट त्यांच्याजवळ नाही. हा पोपट हरवल्याची चर्चा शहरभर रंगली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या