JOIN US
मराठी बातम्या / Viral / Knowledge : कधी विचार केलाय लिफ्टमध्ये का असतो आरसा? चेहरा पाहण्यासाठी नाही, तर हे त्यामागचं खरं कारण

Knowledge : कधी विचार केलाय लिफ्टमध्ये का असतो आरसा? चेहरा पाहण्यासाठी नाही, तर हे त्यामागचं खरं कारण

तुम्ही म्हणाल की लिफ्टमध्ये येणाऱ्या लोकांना स्वत:ला पाहण्यासाठी तो लावला जात असावा. तर असं नाहीय…

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 15 सप्टेंबर : आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी घडत असतात. ज्यांच्याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. तसेच आपल्या वापरातल्या देखील अशा अनेक वस्तु आहेत. ज्यांबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते किंवा आपण त्याचा वापर योग्य पद्धतीने करत नसावं. त्यांपैकी एक म्हणजे लिफ्टमधील आरसे. आता हेच पाहाना आधीच्या काळात लिफ्ट असा कोणता प्रकार नव्हता. परंतू इमारतींची उंची वाढू लागली तशी लिफ्टची गरज जास्त भासू लागली. ज्यानंतर एकापेक्षा एक हायटेक लिफ्ट येऊ लागल्या. तुम्ही देखील मॉल, हॉटेल, ऑफिस किंवा कोणत्याही इमारतीमधील लिफ्टने गेला असाल. तेव्हा तुम्हाला लिफ्टमध्ये आरसा असलेलं दिसलं असेल. परंतू असं का? लिफ्टमध्ये हा आरसा का लावला जातो? असा कधी तुम्हाला प्रश्न पडला आहे? आता तुम्ही म्हणाल की लिफ्टमध्ये येणाऱ्या लोकांना स्वत:ला पाहण्यासाठी तो लावला जात असावा. तर असं नाहीय… खरंतर स्वत:ला पाहण्यासाठी आरसा लिफ्टमध्ये लावला जातो, हे कारण खरं असलं तरी देखील त्याचं मुख्य कारण काही वेगळंच हे. हे वाचा : एका साध्या फोटोत लपल्यात 8 वस्तू, त्यांना 10 सेकंदात शोधून काढण्याचं चॅलेंज तुम्ही स्वीकारणार? ऑफिस असो वा मॉल किंवा इतर कुठलीही उंच इमारत, अनेक ठिकाणी लिफ्ट बसवली जाते. तुम्हीही दैनंदिन जीवनात या मशीनचा वापर करत असाल. काही काळापूर्वी लिफ्टमध्ये आरसे बसवण्याचे काम सुरू करण्यात आले होते. अनेक लिफ्टमधील आरसेही तुमच्या लक्षात आले असतील. चला तर मग जाणून घेऊया त्यामागचे कारण काय आहे. वास्तविक, जेव्हा लोकांनी लिफ्टचा वापर केला तेव्हा अनेकांना लिफ्टचा वेग खूप जास्त वाटला. ज्यामुळे लोक तक्रारी देखील करु लागले. त्यानंतर जेव्हा या गोष्टीचा विचार केला गेला, तेव्हा असे समजले की, लोकांचे लक्ष लिफ्टच्या भिंतींकडे होते, त्यामुळे त्यांना लिफ्टचा वेग अधिक जाणवत होता. यानंतर लिफ्ट बनवणाऱ्या कंपन्यांनी ही समस्या सोडवण्यासाठी लिफ्टच्या भिंतींवर आरसे लावण्यास सुरुवात केली. हे वाचा : कुठे खडकांवर टांगतात, तर कुठे कुटुंबीय खातात मृतदेह; ‘या’ विचित्र अंत्यसंस्कार परंपरा मन हेलावणाऱ्या आरसा लावल्यानंतर ही समस्या सुटली. आरसा लावल्यानंतर लोकांना भिंती दिसत नव्हत्या तसेच लोकांचा वेळ स्वत:ला पाहण्यात जायचा. ज्यामुळे त्यांना लिफ्टच्या वेगाचा अंदाज येत नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या