JOIN US
मराठी बातम्या / Viral / Zoo मधून पळालेला चिंपांझीचे नखरेच भारी, अनेक विनंत्या करुन देखील परतायला तयार नाही, अखेर... पाहा Video

Zoo मधून पळालेला चिंपांझीचे नखरेच भारी, अनेक विनंत्या करुन देखील परतायला तयार नाही, अखेर... पाहा Video

हा चिंपाझी प्राणीसंग्रहालयातून पळून गेला आणि रस्त्यावर आणि उद्यानांमध्ये तासनतास हिंडला. प्राणीसंग्रहालयातील अनेक कर्मचारी चिचीच्या मागे गेले आणि त्याला परत येण्यासाठी मन वळवण्याचा प्रयत्न करु लागले. परंतु तो काही तयार झाला नाही. मग अखेर…

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

खारकिव्ह 7 सप्टेंबर : सोशल मीडियावर आपल्याला प्राण्यासंबधीत अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. ज्यामध्ये कधी एखाद्या शिकारीचा, कधी वाईल्ड लाईफचा तर कधी गोंडस असा व्हिडीओ पाहायला मिळतो. परंतू सध्या सोशल मीडियावर प्राण्यासंबंधीत एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, तो खरोखरंच खूप सुंदर व्हिडीओ आहे. जो पाहून तुमच्या चेहऱ्यावर हसू आल्याशिवाय राहाणार नाही. यामुळेच हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वात ट्रेंडिंग व्हिडीओपैकी एक आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक चिंपांझी माकड रस्त्यावर फिरताना दिसत आहे. खरंतर हा माकड झू म्हणजेच प्राणी संग्रालयातून पळून आला आहे. ज्यानंतर प्राणीसंग्रालयातील काही कर्मचारी या चिंपांझीला पुन्हा न्यायला येतात आणि त्यांच्यासोबत येण्यासाठी त्याला विनंती करतात. परंतू हा चिंपांझी काही तयार होत नाही. परंतू काही वेळानं जेव्हा पाऊस पडतो, तेव्हा हा चिपांझी प्राणीसंग्रहालयाच्या कर्मचाऱ्याजवळ जातो, त्यावेळी कर्माचारी त्याला आपल्या जॅकेट काढून देते. ही सगळी घटना घडल्यानंतर तो चिंपांझी अखेर त्या कर्मचाऱ्यांसोबत प्राणीसंग्रहालयात जाण्यासाठी तयार होतो. व्हिडीओच्या शेवटी तुम्ही चिंपांझीला सायकल वरुन घेऊन जातानाही पाहू शकता. हा व्हिडीओ आणि चिपांझीची सगळी नाटकं पाहाताना फारच मजा येत आहे. चिंपांझीचं असं वागणं लोकांना फारच आवडलं आहे, ज्यामुळे ते या व्हिडीओला खूपच पसंती दर्शवत आहेत. हे वाचा : खारुताईसोबत घडली अशी गोष्ट, वाचून तुम्ही म्हणाल, ‘‘मला पण खारुताई व्हावसं वाटतंय’’ हा व्हिडीओ युक्रेनमधील खारकिव्ह मधील असल्याचे सांगितले जात आहे. सोमवारी हा चिची चिंपांझी प्राणीसंग्रहालयातून पळून गेला आणि रस्त्यावर आणि उद्यानांमध्ये तासनतास हिंडला. प्राणीसंग्रहालयातील अनेक कर्मचारी चिचीच्या मागे गेले आणि त्याला परत येण्यासाठी मन वळवण्याचा प्रयत्न करु लागले. परंतु तो काही तयार झाला नाही.

संबंधित बातम्या

दरम्यान, एका महिलेनेही चिचीच्या बाजूला बसून त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, खूपवेळ चिचीला समजावून देखील त्याचा काही उपयोग झाला नाही. मात्र, जेव्हा पाऊस सुरू झाला तेव्हा चिची या महिलेकडे आला. मग तिने तिला आपला जॅकेट दिला. ज्यानंतर या चिंपाझीने महिलेला मिठी देखील मारली. हे वाचा : कधी पाहिलाय पाण्यावर चालणारा कुत्रा? या जादुई कुत्र्याला पाहूण सगळेच हैराण, पाहा Video ट्विटर वापरकर्ता आणि आऊटरायडर्स पत्रकार हन्ना लिउबाकोवा यांनी हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले, “खार्किवमध्ये, एक चिंपांझी प्राणीसंग्रहालयातून पळून गेला. तो शहरात फिरत असताना प्राणीसंग्रहालयाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला परत येण्यासाठी समजावण्याचा प्रयत्न केला. अचानक पाऊस सुरू झाला आणि माकड प्राणीसंग्रहालयाच्या कर्मचाऱ्याकडे जॅकेटसाठी धावले आणि नंतर तो प्राणीसंग्रहालयात परत येण्यास तयार झाला.”

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या