नवी दिल्ली 08 जानेवारी : सोशल मीडियावर (Social Media) सतत निरनिराळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत राहतात. यातील काही व्हिडिओ इमोशनल, काही विनोदी, काही डान्सचे तर काही स्टंटचे असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एका ऑफिसमधील आहे. यात दिसतं की काम करत असताना एका कर्मचाऱ्यासोबत असं काही घडतं, जे पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल (Funny Video Viral) होत असून लाखो लोकांना हसवत आहे. OMG! चक्क एका पक्षाने केली प्राण्याची शिकार; अंगावर काटा आणणारा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक विक्रम भट्ट यांनी आपल्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. हा व्हिडिओ एका ऑफिसमधील आहे. यात तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती फोनवर बोलतच काहीतरी काम करत आहे. फोनवर बोलतच तो खुर्चीवर आरामात टेकून बसण्यासाठी थोडं मागे सरकतो. याचदरम्यान खुर्चीचा मागचा भाग तुटतो आणि हा व्यक्ती धाडकन खाली पडतो (Employee Fell from Chair in Office). हा व्यक्ती इकडे-तिकडे पाहून लगेचच उठून बसतो.
या व्यक्तीच्या मागेच बसलेला इतर स्टाफही अचानक हा आवाज ऐकून घाबरतो. यानंतर जेव्हा ते मागे वळून बघतात तेव्हा समजतं की आपला सहकारी खाली पडला आहे. हा व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. व्हिडिओला कसलाही आवाज नाही. मात्र लोक खळखळून हसताना यात दिसतात. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. तर अनेकांनी व्हिडिओ शेअरही केला आहे. श्वानामुळे वाचला गिर्यारोहकाचा जीव; मालकासाठी जे केलं ते जाणूनच व्हाल थक्क विक्रम भट्ट यांनी व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिलं, मला आश्चर्य वाटतं की याने फोनवर नेमकं असं काय ऐकलं असेल. विक्रम भट्ट यांच्या या पोस्टवर लोक मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने पोस्टवर कमेंट करत म्हटलं, तुमच्या चित्रपटांप्रमाणे जिथे वाईट काहीतरी असतं, तिथे चांगलंही घडतं आणि जिथे भूत असतं, तिथे देवही असतो.