जमिनीवर राहणारा सर्वांत मोठा व शक्तिमान प्राणी आहे. एकूण प्राणिसृष्टीत फक्त काही देवमासे हत्तीपेक्षा मोठे आहेत. तसेच तो प्राणिसृष्टीमधील जिराफानंतरचा सर्वांत उंच प्राणी आहे. जसा हत्ती हा शक्तिमान प्राणी आहे, तसा तो एक बुध्दिमान प्राणीही आहे. हत्तीच्या या बुद्धिमत्तेचा प्रत्येय नुकत्याच एक व्हायरल व्हिडीओमध्ये दिसला. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये रस्ता क्रॉस करण्यासाठी हत्तीनं वापरलेल्या जुगाडाची सर्वच कौतुक करत आहे. याआधी हत्तीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यात हत्ती चक्क इलेक्ट्रिक फेंस तोडून रस्ता क्रॉस करताना दिसत होता. आता व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये हत्ती मोठ्या हुशारीनं विजेच्या तारा तोडताना दिसत आहे. यात हत्तीचा जुगाड सर्वांचे मन जिंकणारा आहे. हत्तीनं या व्हिडीओमध्ये आपल्या ताकदीपेक्षा बुध्दिमत्तेचा वापर जास्त केला आहे. वाचा- ‘अजित पवार म्हणजे धोबी का पप्पू’ बॉलीवूड अभिनेत्याने उडवली खिल्ली हा व्हिडीओ एक ट्विटर युझर डॉक्टर पीएम धकाटे यांनी शेअर केल आहे. या व्हिडीओला त्यांनी, ‘‘गजराज, एक हत्ती, जमिनीवर राहणारा सर्वात बुध्दिमान प्राणी आहे. हा एक अद्भुत व्हिडीओ आहे, यात हत्ती पहिली या विजेच्या तारांना हात लावून झटका बसतोय का ते पाहत आहे. त्यांनतर या तारा तोडण्याचा निर्णय त्यांनं घेतला”, असे कॅप्शन लिहिले आहे.
वाचा- रणवीर सिंहचा ड्रेस घालून फसली बॉलिवूड अभिनेत्री, नेटकरी म्हणाले… या व्हिडीओमध्ये हत्तीच्या बुध्दिमत्तेचं कौतुक तुम्हीही कराल आता पर्यंत हा व्हिडीओ 6 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. दरम्यान, हा व्हिडीओ कोणत्या देशातला आहे हे अद्याप कळलेले नाही. वाचा- …आणि अचानक दीपिकानं उघड केलं आलिया-रणबीरच्या लग्नाचं गुपित, पाहा VIDEO