नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी : बर्याचदा सोशल मीडियावर प्राण्यांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यात श्वान, मांजर, पांडा आणि हत्ती यांचे व्हिडिओ सगळ्यात जास्त शेअर केले जातात. मग आंब्याच्या शोधात हत्ती फिरत असतानाचा व्हिडिओ असो किंवा रात्री उशिरा झोपलेल्या एका मगरच्या तोंडातून अन्न चोरणारा चित्ता असो, असे सगळे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. दरम्यान, सोशल मीडियावर एक नवीन व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोन हत्ती ट्रकच्या बाहेर उस खाताना दिसत आहेत. या दोन्ही हत्तींना लॉरीमधून दुसर्या ठिकाणी घेऊन जात होते. त्याचवेळी लॉरी वाटेत एका ठिकाणी थांबली आणि शेजारी ऊसानं भरलेला ट्रकही आला. या ट्रकमध्ये ऊस होता, आणि ऊस पाहून हत्तीने लंच ब्रेक घेत थेट ट्रकमधून ऊस खायला सुरुवात केली. वाचा- VIDEO : भयंकर वादाळामुळे रन वेवर उतरलेलं विमान पुन्हा हवेत उडालं
हा व्हिडिओ आयएफएस सुशांत नंदा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओ अपलोड करताना त्यांनी, “स्वादिष्ट अन्न … ऊस हत्तीचा आवडता पदार्थ आहे.”, असे कॅप्शन लिहिले आहे. वाचा- VIDEO: धावत्या रेल्वेच्या दारात बनवत होता TikTok, हात सुटला अन्…
वाचा- खरं की खोटं! चीनमध्ये कोरोना झालेल्यांना गोळी मारून केलं जातंय ठार? मुख्य म्हणजे ऊस हा हत्तींच्या आहारासाठी खूप महत्वाचे आहे कारण यामुळे त्यांना ताकद मिळते.