फोटो सौजन्य - Canva
मुंबई, 04 डिसेंबर : पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती गोल फिरते हे आपल्याला माहितीच आहे. पृथ्वीच्या भ्रमणाचे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील पण सध्या असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जो पाहून तुम्ही थक्क व्हाल. पण शक्यतो हे व्हिडीओ स्पेस स्टेशनमधून शास्त्रज्ञ टिपतात किंवा एखाद्या सॅटेलाइटच्या माध्यमातून टिपलं जातं. पण कधी जमिनीवर उभं राहून तुम्ही पृथ्वीला फिरताना पाहिलं आहे का? या व्हिडीओत तुम्ही तेच पाहू शकता. पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास 24 तास म्हणजे पूर्ण एक दिवस लागतो. इतक्या वेगाने ती फिरते पण तरी आपल्याला ती गोल फिरते हे समजत नाही. तसं पृथ्वी प्रतितास 1674 किमी वेगाने फिरते. या वेगाने फायटर जेट उडतात. ज्यावर उभं राहून तर तुम्ही प्रवास करूच शकत नाही. हा वेग तुम्ही या व्हिडीओत पाहू शकता. हे वाचा - एकेकाळी पृथ्वीसारख्या असणाऱ्या शुक्रावर आज जीवसृष्टी का नाही? शास्त्रज्ञांना मिळालं उत्तर सुरुवातीला सर्व काही सामान्य दिसतं. म्हणजे डोंगर, नदी दिसते. नंतर पृथ्वी फिरते आणि डोंगर, नदीही जशीच्या तशी उलटी होते. एरवी तुम्ही पाण्याने भरलेला ग्लास उलटा केला तरी त्यातील पाणी सांडतं. इथं तर पृथ्वी पूर्ण फिरली तरी त्यावर असलेलं पाणी साधं हललंही नाही आहे. अवघ्या 19 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. नेदरलँड्सच्या सँडर यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. पृथ्वीच्या भ्रमणाचा असा व्हिडीओ फोटोग्राफर्स गाइरोस्कोपिक कॅमेऱ्याच्या मदतीने बनवतात.
इतक्या वेगाने फिरणाऱ्या या पृथ्वीवर आपण आहोत पण तिच्या या वेगाचा आपल्यावर काहीच परिणाम होत नाही. याचं कारण म्हणजे त्याची गुरुत्वाकर्षण शक्ती. ज्यामुळे पृथ्वीसकट आपणही गोल फिरत असतो आणि आपल्याला याची माहितीही नसते. गुरुत्वाकर्षणामुळे बदलतोय पृथ्वीचा आकार गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागामध्ये अनेक बदल होत आहेत. पर्वतीय प्रदेश कमी होऊ लागले आहेत. भूगर्भात जवळपास 24 किलोमीटर आतपर्यंत घुसलेले मोठाले खडक बाहेर येऊ लागले आहेत. यामुळे जे खडकांचे आकार तयार होत आहे, त्याला मेटामॉर्फिक कोअर कॉम्प्लेक्सेस असं म्हणतात. याची प्रक्रिया हे अजूनही न उलगडलेलं कोडं आहे. या रहस्याचा शोध घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी अमेरिकेतील फिनिक्स आणि लास वेगास या दोन मेटामॉर्फिक कॉम्प्लेक्सेसची निवड केली. हे दोन्ही प्रदेश त्याठिकाणी असलेली प्राचीन पर्वतांची रांग नामशेष झाली आहे. मेटामॉर्फिक कॉम्प्लेक्सेसमध्ये अशा प्रकारचे मोठमोठे पाषाण तयार होतात, मात्र ते मुळापासून उखडलेही जाऊ शकतात. त्यामुळे गंभीर परिस्थिती ओढवू शकते. पृथ्वीच्या वरील पृष्ठभागापासून त्याच्या आतली मुळं तुटली, तर ते हानीकारक ठरू शकतं. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जमिनीचा पातळ थर पर्वतरागांच्या खाली मात्र जाड होतो. पृथ्वीच्या आतील भागातील प्रावरणाची जागा तो घेतो. यामुळे उष्णता बाहेर पडते. द्रव पदार्थाची हालचाल होते. दगड वितळू लागतात. यामुळे पर्वतांची मुळं नष्ट होऊ लागतात. पर्यायानं पर्वतरांगा नष्ट होतात. हे वाचा - PHOTO : या जंगलात शिकारीसाठी दबा धरून बसलेत 6 खतरनाक प्राणी; प्रत्येकाला 20 सेकंदात शोधलंत तर तुम्हाला मानलं फिनिक्स आणि लास वेगास शहरं अशा मेटामॉर्फिक कॉम्प्लेक्सेसवर तयार झाली आहेत. अशा ठिकाणांना भूकंपाचा धोका असतो. पृथ्वीच्या आतील गुरुत्वाकर्षणाची शक्ती आणि बाहेरच्या वातावरणातील बदल यामुळे हे घडू शकतं. पृथ्वीवरील सजीवांचं तसंच पृथ्वीच्या अंतरंगातील जीवाष्मांचं यामुळे नुकसान होऊ शकतं. एकंदरीतच पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवर व तिच्या अंतरंगात अनेक बदल होत आहेत. त्याचा परिणाम म्हणून पृथ्वीचा आकारही बदलतो आहे. ही प्रक्रिया धीम्या गतीनं होत असल्यानं ते चटकन लक्षात येत नाही.