नवी दिल्ली 05 जानेवारी : बदक आणि कोंबडा किंवा कोंबडी हे असे पक्षी आहेत, जे लोक मोठ्या संख्येनं पाळतात. बदक हे जमिनीवर आणि पाण्यात दोन्हीकडे राहू शकतात. मात्र कोंबड्यांमध्ये हा गुण नाही. मात्र या दोन्ही पक्षांची चोच अतिशय धारदार असते. यामुळे ते कोणालाही जखमी करू शकतात. सध्या सोशल मीडियावर याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Duck and Chicken Attacked on a Girl) होत आहे. यात एका बदकाने आणि कोंबड्याने मिळून तरुणीला अक्षरशः नाकीनऊ आणल्याचं पाहायला मिळतं. हा व्हिडिओ (Shocking Video Viral) अतिशय मजेशीर असून लोकांच्या पसंतीसही उतरत आहे. स्टंट करत असतानाच अचानक कारचे 2 तुकडे झाले अन्…; Shocking Video सोशल मीडियावर सतत मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. मात्र असे व्हिडिओ अतिशय कमीच पाहायला मिळतात. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक तरुणी एका बगीच्यामध्ये येते. इथे आधीपासूनच भरपूर बदक आणि कोंबड्या असतात. तरुणीला पाहताच आधी बदक तिच्यावर हल्ला करायला सुरुवात करतो आणि तिचा पाय आपल्या चोचीने जखमी करतो. यानंतर बदक दूर जाताच कोंबडा तिथे येतो आणि या तरुणीवर हल्ला करण्यास सुरुवात करतो. तोदेखील तिचा पाय आपल्या चोचीने जखमी करू लागतो. तरुणीच्या चेहऱ्यावरील हावभाव एकदम बदलतात मात्र तरीही ती स्वतःला सावरते आणि तिथून पळ काढते.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ earthdixe नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. आतापर्यंत 11 मिलियन म्हणजेच 1.1 कोटीहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर 2 लाखहून अधिकांनी व्हिडिओ लाईक केला आहे. विनामास्क खरेदीसाठी पोहोचलेल्या महिलेचा पराक्रम; स्वतःचे कपडे काढले अन्.., VIDEO अनेकांनी यावर मजेशीर कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने यावर कमेंट करत लिहिलं, त्यांचे पंजे घातक ठरू शकतात. त्यात भरपूर कचरा असतो आणि सोबतच ते धारदार आणि मोठेही असतात. तर दुसऱ्या एका यूजरने कमेंट करत लिहिलं, तो दिवस नक्की चिकन सूपचा दिवस असेल. याशिवाय इतरही अनेकांनी यावर मजेशीर कमेंट केल्या आहेत.