JOIN US
मराठी बातम्या / Viral / एकीकडे खोल दरी तर दुसरीकडे भलामोठा डोंगर; अतिशय अरूंद रस्त्यावर वळवू लागला कार अन्.., VIDEO

एकीकडे खोल दरी तर दुसरीकडे भलामोठा डोंगर; अतिशय अरूंद रस्त्यावर वळवू लागला कार अन्.., VIDEO

व्हिडिओमध्ये टेकडीवरील अतिशय छोट्या जागेत एक चालक आपली कार वळवताना दिसतो (Driver Turned a Car on Dangerous Hilly Road). हा रस्ता अतिशय अरुंद आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 24 जानेवारी : सोशल मीडियावर अनेकदा विचित्र आणि हैराण करणारे व्हिडिओ व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतं. अनेक व्हिडिओ तर असे असतात, जे पाहून डोळ्यांवर विश्वास बसत नाही. काहीवेळी माणसाने केलेले अजब कारनामे किंवा काहीवेळी प्राण्यांच्या मस्तीचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. मात्र, सध्या जो व्हिडिओ चर्चेत आहे, तो अतिशय वेगळा आणि भीतिदायक आहे. व्हिडिओमध्ये टेकडीवरील अतिशय छोट्या जागेत एक चालक आपली कार वळवताना दिसतो (Driver Turned a Car on Dangerous Hilly Road). हा रस्ता अतिशय अरुंद आहे. पाळीव श्वानाला वाचवण्यासाठी अस्वलासोबत भिडला व्यक्ती; धडकी भरवणारा VIDEO न्यूज18 लोकमत या व्हिडिओच्या सत्यतेची पुष्टी करत नाही कारण हा व्हिडिओ कुठला आहे आणि ड्रायव्हर कोण आहे, याबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही. ट्विटर यूजर डॉक्टर अजयिता यांनी हा व्हिडिओ आपल्या अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये (Shocking Video Viral) एक निळ्या रंगाची अगदी उंच डोंगरावरील अरूंद रस्त्यावर वळताना दिसते. हा रस्ता इतका अरूंद आहे, की कार वळतवताना तिची मागच्या बाजूची चाके हवेतच लटकलेली आहेत. मात्र, आतील चालकाचं गाडीवर अगदी योग्य कंट्रोल आहे, यामुळे तो अगदी अवघड ठिकाणीही गाडी वळवतो.

संबंधित बातम्या

व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की डोंगरावर एका बाजूला अतिशय खोल दरी आहे तर दुसरीकडे डोंगराचा भाग. कारच्या मागे एका घराची इमारत दिसत आहे, जिथून एक अतिशय अरूंद रस्ता जात आहे. कार याच रस्त्यावर उभा असून चालक इथेच आपली गाडी वळवण्याचा प्रयत्न करत आहे. तो अतिशय छोटे छोटे कट घेतो. आणि स्टेअरिंग व्हीलसोबत एक्सीलेटर, क्लच आणि ब्रेक यावर चांगलं नियंत्रण करतो. हा व्हिडिओ पाहून कोणीही थक्क होईल.

मृत्यूचा Live Video; चालत्या बाईकवर सोडला जीव; रात्रभर रस्त्यावरच पडून राहिला

व्हिडिओला देण्यात आलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलं गेलं, 80 पॉईंट टर्नचं परफेक्ट उदाहरण. मात्र, न्यूज १८ या व्हिडिओची पुष्टी करत नाही. हा व्हिडिओ एडिट केला गेला असल्याचीही शक्यता आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आतापर्यंत जवळपास 9 लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर हजारो लोकांनी तो रिट्विटही केला आहे. अनेकांनी हा सवालही उपस्थित केला आहे, की हा व्हिडिओ खरा आहे की खोटा? याशिवायही अनेकांनी व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या