JOIN US
मराठी बातम्या / Viral / डॉमिनोजच्या डिलिव्हरी बॉयने महिलेला केले प्रपोज, म्हणाला, 'मी तोच आहे जो....'

डॉमिनोजच्या डिलिव्हरी बॉयने महिलेला केले प्रपोज, म्हणाला, 'मी तोच आहे जो....'

आजकाल सोशल मीडियाचा जग झालं आहे. त्यामुळे सगळं सहजरित्या ऑनलाईन मिळून जातं. मग ते खाण्यापासून तर घराच्या सामानापर्यंत सर्वच ऑनलाईन मागवता येतं.

जाहिरात

डॉमिनोजच्या डिलिव्हरी बॉयने महिलेला केले प्रपोज

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 02 जुलै : आजकाल सोशल मीडियाचा जग झालं आहे. त्यामुळे सगळं सहजरित्या ऑनलाईन मिळून जातं. मग ते खाण्यापासून तर घराच्या सामानापर्यंत सर्वच ऑनलाईन मागवता येतं. विशेष करुन खाण्याच्या ऑनलाईन सोयीमुळे अनेकांचा घरी बनवण्याचा त्रास कमी झालाय. जवळपास सर्वच लोक अनेकवेळा ऑनलाईन फूड ऑर्डर करतात. मात्र कधी कधी ऑनलाईन डिलिव्हरी करणाऱ्यासोबत ग्राहकांची बाचाबाची होताना दिसते. अशा अनेक निरनिराळ्या घटना समोर येत असतात. नुकतीच एका डिलिव्हरी बॉय आणि ग्राहकाची एक घटना समोर आलीये. ज्यामध्ये डिलिव्हरी बॉयने ग्राहक महिलेच्या नंबरचा गैरवापर केला. एका महिलेला डिलिव्हरी बॉयने प्रपोज केलं. त्यानं महिलेनं ऑनलाईन दिलेल्या नंबरचा गैरवापर केला. त्यामुळे महिलेनं संताप व्यक्त केलाय. महिलेनं तिच्यासोबत घडलेला प्रकार सोशल मीडियाच्या माध्यामातून शेअर केला आहे.

महिलेनं सांगितलं की, तिनं डॉमिनोज वरुन पिझ्झा मागवला होता. पिझ्झा ऑर्डर केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिला डिलिव्हरी बॉयचा मेसेज आला. त्यात त्याने लिहिले, ‘माफ करा माझे नाव कबीर आहे, काल मी तुमच्या घरी पिझ्झा डिलिव्हरी करण्यासाठी आलो होतो. मला तुम्ही आवडता.’ महिलेने या चॅटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

संबंधित बातम्या

तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं, मला विचारायचे आहे की कोणत्याही डिलिव्हरी बॉयला पाठवलं आहे की तो ग्राहकाच्या नंबर आणि पत्त्याचा गैरवापर करतो. या व्यक्तीला मी आवडत असले तरी कंपनीच्या माध्यमातून दिलेल्या नंबरचा, पत्त्याचा गैरवापर करणं योग्य आहे का? महिलेनं याविषयी डॉमिनोजशी केलेल्या चॅटचाही स्क्रिनशॉट शेअर केला. तिनं सांगितलं की, त्याचे नाव कबीर आहे आणि डॉमिनोज स्टोअरमध्ये मन्नू आहे, तर ईमेल अॅड्रेसमध्ये त्याचे नाव कबीर बबलू आहे, हा माणूस वेगवेगळ्या नावांनी काय करत आहे याचा तुम्ही अंदाज लावू शकता. हे समोर आलेलं प्रकरण उत्तर प्रदेशचं आहे. या प्रकरणी पोलीसांकडे तक्रारही दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी तिला योग्य कारवाई केली जाईल याचं आश्वासन दिलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या