लंडन 19 ऑक्टोबर : ब्रिटनमधील एका व्यक्तीसोबत अजब घटना घडली. डॉक्टरांनी या व्यक्तीच्या पोटातून नोकिया फोन काढला आहे. या व्यक्तीनं सहा महिन्यांपूर्वी चुकून एक फोन गिळला होता (Man Swallowed Mobile Phone). विशेष बाब म्हणजे या व्यक्तीला स्वतःलाही ही बाब माहिती नव्हती की त्याच्या पोटामध्ये मोबाईल आहे. मात्र, सतत पोटदुखी होत असल्याने अखेर तो डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी एक्सरे केला आणि यानंतर त्यांना धक्का बसला. लगेचच या व्यक्तीचं ऑपरेशन करण्यात आलं आणि फोन पोटातून बाहेर काढण्यात आला (Doctors Removed Mobile from Stomach After Surgery).
माकडाने ट्रेनरवरच काढला राग; तलवारीनं केला हल्ला अन्.., पाहा Viral Video
सध्या या व्यक्तीची प्रकृती स्थिर आहे. मिरर यूकेच्या वृत्तानुसार, इजिप्तच्या अस्वान युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये 33 वर्षीय व्यक्तीच्या पोटावर शस्त्रक्रिया झाली. मात्र, या व्यक्तीच्या पोटामध्ये फोन निघेल, याती डॉक्टरांना अजिबातही कल्पना नव्हती. या व्यक्तीनं फोन कसा गिळला हे अद्याप समोर आलेलं नाही. यूएईच्या मीडिया आउटलेट गल्फ टुडेच्या म्हणण्यानुसार, अस्वान युनिव्हर्सिटी हॉस्पिटलच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष मोहम्मद अल-दाहशौरी म्हणाले की, त्यांनी पहिल्यांदाच असं प्रकरण पाहिलं आहे. ज्यामध्ये एका रुग्णाच्या पोटातून संपूर्ण मोबाईल फोन बाहेर काढण्यात आला.
Bill Gates यांच्या मुलीनं बांधली लग्नगाठ; रिसेप्शनचा खर्च वाचून चक्रावून जाल
ऑपरेशन करणाऱ्या वैद्यकीय पथकाचे नेतृत्व करणारे डॉ स्कंडर तेलजाकू यांनी रुग्णाच्या पोटातून काढलेल्या गुलाबी रंगाच्या नोकिया 3310 फोनची छायाचित्रे शेअर केली आहेत. तसंच रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची माहितीही डॉक्टरांनी दिली आहे.