JOIN US
मराठी बातम्या / Viral / अजब प्रकरण! डॉक्टरांनी 55 वर्षीय रुग्णाच्या पोटातून ऑपरेशन करून काढला काचेचा ग्लास

अजब प्रकरण! डॉक्टरांनी 55 वर्षीय रुग्णाच्या पोटातून ऑपरेशन करून काढला काचेचा ग्लास

ऑपरेशनचे आणि एक्स-रेचे व्हिडिओ फुटेज शेअर करत डॉ हसन म्हणाले, ‘काचेचा ग्लास रुग्णाच्या शरीरात कसा पोहोचला, हे अजूनही गूढच आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पाटणा 21 फेब्रुवारी : डॉक्टरांच्या एका टीमने ऑपरेशदरम्यान 55 वर्षाच्या व्यक्तीच्या पोटातून काचेचा ग्लास बाहेर काढला आहे (Doctors Removed Glass from Stomach). ही घटना बिहारमधील आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, रुग्ण बद्धकोष्ठता आणि तीव्र पोटदुखीची तक्रार घेऊन मुझफ्फरपूरच्या मादीपूर भागात असलेल्या एका खाजगी रुग्णालयात पोहोचला होता. डॉक्टरांनी ऑपरेशन करून त्याच्या पोटातून काचेचा ग्लास बाहेर काढला. टेकडीवरुन 300 फूट खाली कोसळला पण…, बचावासाठी एअर फोर्सचे अथक प्रयत्न, VIDEO वैशाली जिल्ह्यातील महुआ येथील रहिवासी असलेल्या रूग्णावर शस्त्रक्रिया करणार्‍या डॉक्टरांच्या टीमचे नेतृत्व करणारे डॉ. महमुदुल हसन यांनी सांगितलं की, रूग्णाच्या अल्ट्रासाऊंड आणि एक्स-रे अहवालात त्याच्या आतड्यांमध्ये काहीतर गंभीर गडबड असल्याचं दिसून आलं. ऑपरेशनचे आणि एक्स-रेचे व्हिडिओ फुटेज शेअर करत डॉ हसन म्हणाले, ‘काचेचा ग्लास रुग्णाच्या शरीरात कसा पोहोचला, हे अजूनही गूढच आहे.’ ते म्हणाले, ‘आम्ही विचारले असता, रुग्णाने चहा पिताना ग्लास गिळल्याचं सांगितलं. पण त्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. मानवी अन्ननलिका अशा वस्तू आत जाण्यासाठी खूप अरुंद आहे. डॉक्टर हसन यांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला एन्डोस्कोपिक प्रक्रियेद्वारे काच गुदाशयातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु तो यशस्वी झाला नाही. त्यामुळे शस्त्रक्रिया करावी लागली आणि रुग्णाला आतड्याच्या आतून हा ग्लास बाहेर काढावा लागला. कधीही पाहिला नसेल असा जबरदस्त स्टंट; VIDEO पाहून घालाल तोंडात बोटं ते म्हणाले, की ‘रुग्णाची प्रकृती आता स्थिर आहे. रुग्ण बरा होण्यास वेळ लागण्याची शक्यता आहे. डॉ हसन यांच्या म्हणण्यानुसार, रुग्णाचं पोट काही महिन्यांत बरे होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर त्याचे आतडे सामान्यपणे काम करू लागतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या