JOIN US
मराठी बातम्या / Viral / Diwali 2022 : बापरे! तोंडातील पेटत्या सिगारेटवर पेटवले रॉकेट्स आणि...; थरकाप उडवणारा VIDEO

Diwali 2022 : बापरे! तोंडातील पेटत्या सिगारेटवर पेटवले रॉकेट्स आणि...; थरकाप उडवणारा VIDEO

काही जण हातात धरूनच फटाके फोडतात. ही व्यक्ती तर त्याच्याही पुढे गेली आहे.

जाहिरात

सिगारेटने पेटवले रॉकेट्स

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 ऑक्टोबर :  दिवाळी म्हटलं की फटाके आलेच. हे फटाके पेटल्यानंतर किंवा फुटल्यानंतर जितके चांगले किंवा आकर्षक वाटतात तितकेच ते खतरनाक, धोकादायकही ठरू शकतात. फटाके वाजवताना नीट काळजी घेतली नाही तर जीवावरही बेतू शकतं. पण तरी काही लोक फटाक्यांशी खेळ करतात. कित्येक जण असे आहेत जे हातातच फटाके फोडतात. पण सध्या सोशल मीडियावर तर असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यात एक व्यक्ती तर याच्याही पुढे गेली आहे. तुम्हाला फक्त वाचूनच धडकी भरेल, या व्यक्तीने चक्क हातात रॉकेट्स पेटवले आहेत. तेसुद्धा तोंडातील सिगारेट्सने. रॉकेट्स आकाशात गेल्यानंतर आकाश अगदी रंगबेरंगी दिसतं. पण हाच रॉकेट् जमिनीवरच फुटलं तर काय होऊ शकतं, हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. याचा अनुभव तुम्ही घेतला असेल किंवा कुठे ना कुठे, कधी ना कधी पाहिलं असेलच. अशाच रॉकेट्सशी या व्यक्तीने खेळ केला. हे वाचा -  अर्रर्र! फटाका पेटवताच तोंडावर पडले BJP चे वरिष्ठ नेते; पुढे काय घडलं पाहा LIVE VIDEO सामान्यपणे रॉकेट्स बाटल्यांमध्ये लावले जातात. जेणेकरून ते उभे राहतील आणि थेट आकाशात जातील. ही बाटली आडवी पडली आणि त्यातील रॉकेट बाहेर आलं तर ते इथं तिथं कुठेही जाऊन फुटू शकतं. त्यामुळे रॉकेट्स लावताना काळजी घ्यावी लागते. असं असताना या व्यक्तीने तर चक्क आपल्या हातात आणि सिगारेट्सने रॉकेट्स पेटवले आहेत.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता  एका व्यक्तीने हातात दिवाळीत फोडले जाणारे फटाका रॉकेट्स धरले आहेत. त्याच्या तोंडात सिगारेट आहे. या तोडांतील सिगारेटवर तो रॉकेट्स धरतो आणि तसेच पेटवतो. त्यानंतर हाताने वर सोडून देतो. असे एकएक करत तो बरेच रॉकेट्स पेटवतो.  व्हिडीओ पाहूनच आपल्याला धडकी भरते. पण या व्यक्तीच्या चेहऱ्यावर मात्र किंचितशीही भीती दिसत नाही आहे. अगदी बिनधास्तपणे तो हा नको तो प्रताप करताना दिसतो आहे. हे वाचा -  Firecrackers Rules: या शहरात फटाके फोडल्यास 6 महिने तुरुंगवास; महाराष्ट्रात काय आहेत नियम? तसा हा व्हिडीओ जुना आहे. पण दिवाळी जवळ येताच आता पुन्हा व्हायरल होऊ लागला आहे. आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. सुशांत नंदा यांनी याला मजेशीर कॅप्शनही दिलं आहे. नासाचा फाऊंडर नक्कीच भारतातील असेल, असं त्यांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या

सुदैवाने या व्यक्तीसोबत काही दुर्घटना घडली नाही आहे. पण असं काही करणं जीवावर बेतू शकतं. त्यामुळे तुम्ही फटाक्यांसोबत असा खेळ करण्याची हिंमत करू नका, इतकंच आवाहन. इतरांनासुद्धा ही बातमी शेअर करत त्यांनाही हाच मेसेज द्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या