पाणीपुरी
नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी : खाण्यापिण्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आजकाल तर खाण्याचे अनेक शौकिन तुम्हाला पहायला मिळतील. वेगवेगळे पदार्थ खाल्ल्यानंतर लोक रिव्ह्यु व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. फूड व्लॉगर नवनवीन पदार्थ ट्राय करुन त्याचे व्हिडीओ शेअर करत असतात. त्यामुळे खवय्यांसाठी खाण्याचे वेगवेगळे प्रकार बनवले जात असून नवीन काहीतरी पदार्थ बनवण्याचा लोकांचा प्रयत्न असतो. अशातच सर्वांचा आवडता स्ट्रीट फूड पदार्थ म्हणजे पाणीपूरी. यामध्येही अनेक हटके प्रकार आजकाल मिळायला लागलेत. सर्वाची आवडती ‘पाणीपूरी’मध्येही निरनिराळे प्रकार पहायला मिळत आहेत.पाणीपुरीमध्ये होणाऱ्या नव्या इनोव्हेशनमुळे ओरिजनल पाणीपुरीची चव कुठेतरी हरवली आहे. त्यामुळे लोकांचाही पाणीपुरी खाण्याचा मुड बिघडला आहे. अशातच आणखी एका वेगळ्या पाणीपुरीचा व्हिडीओ समोर आला आहे. सध्या नव्या पाणीपुरी प्रकाराचा व्हिडीओ समोर आला आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसतंय की, आईस्क्रीम पाणीपुरी बनवली जात आहे. पाणीपुरीच्या पुऱ्यांमध्ये आईस्क्रीम भरली जात असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यानंतर त्याच्यावर वेगवेगळे सॉसेस भरले जात आहे. मात्र हा व्हिडीओ पाहून पाणीपुरी खाण्याची इच्छा जात आहे. हा व्हिडीओ Mi_nashikkar_या फेसबुक अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर खूप साऱ्या कमेंट येताना दिसत आहे. सोबत लोक पाणीपुरी खाण्याची इच्छा घालवल्याचं म्हणत आहे.
दरम्यान, आईस्क्रीम पाणीपुरीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यापूर्वीही पाणीपुरीमध्ये नवनवीन पदार्थांचा समावेश करुन काहीतरी वेगळी पाणीपुरी करण्याचा प्रयत्न केल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. मात्र अशा प्रकारांमुळे ओरिजनल पाणीपुरी खाण्याचाही मुड जात आहे.