बीजिंग, 28 मे : चीनमधला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तीन वर्षांचा चिमुरडा तिसऱ्या मजल्यावरच्या बाल्कनीतून खाली घसरली. सुदैवानं जाळी असल्यामुळं ती हवेत लटकत राहिली. ही घटना सोमवारी गुआंगजौ शहरात घजली. असे सांगितले जात आहे की, एका डिलिव्हरी बॉयनं भितींवर चडून मुलाचा जीव वाचवला. आता हा मुलगा सुरक्षित आहे. हा व्हिडीओ ट्विटरवर XHNews यांनी शेअर केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 9 हजार लोकांनी पाहिला आहे तर 195 लाइक्स मिळाले आहेत. या व्हिडीओमध्ये तीन वर्षांचा चिमुरडा खिडकीला लटकताना दिसत आहे. त्याचं डोकं जाळीमध्ये अडकल्यामुळं ती वाचली. या व्हिडीओमध्ये एक महिला या बाळाला वर काढण्याचे प्रयत्न करतानाही दिसत आहे. तेवढ्यातच एक डिलिव्हरी बॉय इमारतीच्या भिंतीवर चढून या लहान मुलाचे प्राण वाचवतो. त्यानंतर जाळी कापून या मुलाला सुखरूप बाहेरही काढण्यात आलं. वाचा- धाडसी आजी! नागाची शेपटी पकडून त्याला घराबाहेर काढलं, VIDEO VIRAL
वाचा- हा VIDEO पाहून रस्त्यावरचे खड्डेही तुम्हाला बरे वाटतील, पाहा जीवघेणा प्रवास सध्या सोशल मीडियावर या डिलिव्हरी बॉयची तुलना सुपरहिरोशी केली जात आहे. व्हिडीओमुळं या डिलिव्हरी बॉयचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. वाचा- VIDEO : फोटो काढायला गेला मुलगा तर अचानक मागून आलं जंगली अस्वल आणि…