अंत्यसंस्कारात लाइव्ह आली मृत महिला. (प्रतीकात्मक फोटो)
लंडन, 23 ऑगस्ट : एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि आपण शेवटचंही त्या व्यक्तीला भेटलो नसू तर किमान एकदा त्या व्यक्तीला भेटून तिच्याशी बोलता आलं असतं तर… असं आपल्याला वाटतंच. पण प्रत्यक्षात काही ते शक्य नाही, हे आपल्यालाही माहिती आहे. पण एक महिला मात्र मृत्यूनंतरही लोकांशी संवाद साधू लागली. ती स्वतःच आपल्या अंत्यसंस्काराला आली आणि सर्वांशी गप्पा मारू लागली. आता हे कसं शक्य आहे ते तुम्हीच तुमच्या डोळ्यांनी पाहा. यूकेत राहणाऱ्या मरिना स्मिथ. ज्यांचा जन्म भारतातील. 16 नोव्हेंबर 1934 रोजी कोलकात्यात त्यांचा जन्म झाला होता. जून 2022 साली त्यांचा मृत्यू झाला. पण मृत होऊनही मरिना यांनी सर्वांसोबत संवाद साधला. त्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक सिक्रेट्सही सांगितले. आता तुम्ही म्हणाल की त्यांचा व्हिडीओ आधी रेकॉर्ड केला गेला आणि हा व्हिडीओ या अंत्यसंस्कारात दाखवला गेला असेल. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल मरिना या स्वतः एकट्या बोलल्या नाहीत. म्हणजे त्यांनी अंत्यसंस्काराला आलेल्या लोकांच्या प्रश्नांची उत्तरंही दिली. म्हणजे त्यांनी लोकांशी एकप्रकारे संवाद साधला. आता हे कसं शक्य झालं? तर टेक्नॉलॉजीमुळे. हे वाचा - Alexa मुळे हेसुद्धा शक्य झालं! प्रिय व्यक्तीच्या मृ्त्यूनंतरही तुम्ही ऐकू शकता तिचा आवाज आर्टिफिशिअल इंटेलिजेंसच्या मदतीने हे शक्य झालं आहे. होलोग्रामच्या मदतीने त्यांचा व्हिडीओ दाखवण्यात आला. AI-पावर्ड होलोग होलोग्राफिक वीडियो टूलच्या मदतीने त्यांनी लोकांशी संवाद साधला.
बीबीसी च्या रिपोर्टनुसार AI-पावर्ड व्हिडीओ प्लॅटफॉर्म StoryFile ने ही व्हिडीओ टेक्नॉलॉजी तयार केली आहे. StoryFile डीपफेक टेक्नोलॉजीपेक्षा वेगळी आहे. जे रिअल प्री-रिकॉर्डेड रिस्पॉन्समार्फत लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देतं. लोक यात रिअल टाइम बोलू शकतात. म्हणजे आधीच हे व्हिडीओ रेकॉर्ड करून सेव्ह केलेले असतात. एआयने व्हिडीओ छोट्या छोट्या क्लिपमध्ये डिव्हाइड करतं. जेव्हा लोक प्रश्न विचारतात तेव्हा त्या प्रश्नाला योग्य असं उत्तर देईल असा व्हिडीओ किंवा क्लिप आपोआप प्ले होते.मरिना यांचा हा व्हिडीओ तयार करण्यासाठी दोन दिवस लागले. ज्यात त्यांनी आपल्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टी शेअर केल्या. हे वाचा - महिलेच्या दफनविधीची तयारी पूर्ण झाली अन् अचानक कॉफिनमधून टकटक आवाज आला; उघडून बघितलं तर… StoryFile चे सीईओ आणि को-फाऊंडर स्टिफन स्मिथ यांनी सांगितलं की त्यांची आई मरिना स्मिथने सर्वात आधी या टेक्नॉलॉजीचा अवलंब केला.