JOIN US
मराठी बातम्या / Viral / चौकात घडला दुचाकीचा अपघात, दोन बाईक एकमेकांना अशाकाही धडकल्या की... पाहा VIDEO

चौकात घडला दुचाकीचा अपघात, दोन बाईक एकमेकांना अशाकाही धडकल्या की... पाहा VIDEO

चौकान दोन वेगवेगळ्या दिशेने जाणाऱ्या बाईक आपापसात अशा धडकतात की, कोणाला काही लक्षात देखील येत नाही. या भयानक अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 1 सप्टेंबर : सोशल मीडियावर एकापेक्षा एक व्हिडीओ आपल्या समोर येत असतात. ज्यांपैकी काही मनोरंजक तर काही थरारक असतात. जे आपल्या काळजाचा ठोका चुकवतात. येथे आपल्याला विचित्र अपघातांचे व्हिडीओ देखील पाहायला मिळतात. जे आपल्यासाठी बऱ्याचदा उदाहरण म्हणून देखील समोर येतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये दोन बाईकची जोरदार टक्कर झाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. अचानक एका चौकात एक भयानक अपघात होतो आणि तिथे उपस्थित असलेले लोक पाहातच राहतात. परंतू त्यांना काय झालंय हे कळतच नाही. या व्हिडीओला तुम्ही नीट पाहाल तर तुमच्या लक्षात येईल की, चौकान दोन वेगवेगळ्या दिशेने जाणाऱ्या बाईक आपापसात धडकतात आणि पुढच्याच क्षणी दोन्ही चालक रस्त्यावर पडतात. परंतू धडकेत एक चालक गंभीर जखमी होतो. तर दुसऱ्या चालकाला फारसं लागत नाही. हा अपघात अगदी काही क्षणातच घडला आहे. हे वाचा : कार नाही… एवढ्या लोकांसाठी तर बसची गरज; पण याने तर चक्कं बाईकवर सगळ्यांना बसवलं, पाहा Video वास्तविक, एका चालकाच्या चुकीमुळे दुसऱ्यालाही त्रास सहन करावा लागला. मुळात ज्याची चूक होती, त्या चालकाला फारसं काही लागलं नाही, ज्यामुळे तो गुपचूप उठून त्या रस्त्यावरून पळू लागला. ज्यानंतर या गाडीवाल्याला पकडण्यासाठी एक तरुण धावला. अखेर या तरुणाने त्या बाईक वाल्याला रोखलं, परंतु तो बाईकवाला हणामारीवर उतरला, ज्यामुळे हा तरुण देखील त्या बाईक चालकापासून दूर पळाल.

संबंधित बातम्या

हे वाचा : त्याची बाईक रेल्वे ट्रॅकमध्ये अडकली आणि समोरुन ट्रेन आली… घटनेचा थरारक Video व्हायरल हा व्हिडीओ लोक पुन्हा पुन्हा पाहत आहेत. ४५ सेकंदांच्या या व्हिडीओला अनेकांनी लाईक आणि रिट्विट केला आहे. कमेंट सेक्शनमध्येही लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. चालकाच्या निष्काळजीपणाबद्दल काहींनी संताप व्यक्त केला, तर काहींनी नशिबाला दोष दिला आहे. खरंतर अपघात हे कधीही होऊ शकतात, जे तुमचे जग उध्वस्त करू शकतात, त्यामुळे रस्त्यावर नेहमीच सावध रहा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या