JOIN US
मराठी बातम्या / Viral / विद्यार्थीनीचा Naach Meri Rani गाण्यावर जबरदस्त डान्स; 19 लाखाहून अधिकांनी पाहिला VIDEO

विद्यार्थीनीचा Naach Meri Rani गाण्यावर जबरदस्त डान्स; 19 लाखाहून अधिकांनी पाहिला VIDEO

एका शाळेतील विद्यार्थीनीचा नाच नेरी रानी गाण्यावरील डान्स व्हायरल (Viral Dance Video of School Girl) झाला आहे. तिचा जबरदस्त डान्स पाहून सगळेच अवाक झाले आहेत

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 07 जानेवारी : सोशल मीडियाच्या दुनियेत गायक गुरू रंधावा (Guru Randhawa’s Latest Song) आणि अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) यांचं नाच नेरी रानी (Naach Meri Rani Song) हे गाणं चांगलंच धुमाकूळ घालत आहे. अनेकजण या गाण्यावर थिरकताना पाहायला मिळतात. नुकतंच एका शाळेतील विद्यार्थीनीचा याच गाण्यावरील डान्स व्हायरल (Viral Dance Video of School Girl) झाला आहे. तिचा जबरदस्त डान्स पाहून सगळेच अवाक झाले आहेत. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. VIDEO: रेल्वे प्रवासादरम्यान आरामात झोपता? मग या व्यक्तीची झालेली अवस्था बघाच व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका छोट्याशा गल्लीत ही मुलगी उभा आहे. ती शाळेच्या गणवेशात दिसते. यानंतर ती नोरा फतेही आणि गुरू रंधावा यांच्या नाच मेरी रानी गाण्यावर डान्स करण्यास सुरुवात करते. तिची एनर्जी आणि जबरदस्त डान्स पाहून कोणीही थक्क होईल. यादरम्यान तिच्या चेहऱ्यावरील हावभावही पाहण्यासारखे आहेत. इतक्या लहान वयात तिने ज्या पद्धतीने नोरा फतेहीच्या डान्स स्टेप कॉपी केल्या आहेत, ते कौतुकास्पद आहे.

संबंधित बातम्या

नोरा फतेहीचं कोणतंही गाणं प्रदर्शित होताच सोशल मीडियावर धुमाकूळ घालतं. आता तिचं गाणं नाच मेरी रानी देखील भरपूर प्रसिद्ध झालं आहे. हे गाणं लोक सतत इन्स्टाग्रामवर निरनिराळ्या व्हिडिओसोबत शेअर करत राहातात. शाळेतील मुलीचा हा डान्स व्हिडिओ स्वतः गायक गुरू रंधावाने आपल्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. इन्स्टाग्रामवर एका दिवसाआधी अपलोड झालेला हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. गुरू रंधावाची ही पोस्ट आतापर्यंत 19 लाखाहून अधिकांनी पाहिली आहे.

नवरी-नवरदेवाला इम्प्रेस करायला गेला अन् झाला पोपट; स्टेजवरच आपटला तरुण, VIDEO

व्हिडिओ पाहून लोक यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं, लवली. तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, ‘वाह! क्या बात है.’ इतरही अनेकांनी निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या