नवी दिल्ली 07 सप्टेंबर : दीर आणि वहिणीचं नातं हे अनोखं आणि अत्यंत खास असतं. या नात्यात मस्करी, मस्ती सन्मान आणि प्रेम या सगळ्याच गोष्टी असतात. याच नात्याची आणखी एक झलक दाखवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Video Viral) होत आहे. यात नवरदेवाचे सर्व भाऊ आपल्या नव्या वहिणीसोबत डान्स (Dance Video of Bride) करताना दिसत आहेत. चोराला मोह आवरेना! एकाच मिनिटात दुकानात 2 वेळा विचित्र पद्धतीनं चोरी; VIDEO व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की नवरदेवाच्या सर्व भावांनी डान्स फ्लोअरवर नाचण्यासाठी एक ग्रुप बनवला आणि आणि ते नवरी-नवरदेवालाही डान्ससाठी बोलवत आहेत. पाहता पाहता लग्नाचं वातावरण आणखीच प्रसन्न होतं आणि नवरी आपल्या दिरांसोबत अन् नवरदेवासोबत थिरकताना आणि मस्ती करताना दिसते.
तरुण-तरुणीचे बाईकवर अश्लील चाळे; सोशल मीडियावरील Viral Video वर टीकेचा भडिमार हा मजेशीर व्हिडिओ वेडिंग राइड इंडिया नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. बातमी देईपर्यंत लग्नातील हा व्हिडिओ 90 हजाराहून अधिकांनी पाहिला होता. दीर आणि वहिणीचा हा डान्स व्हिडिओ सर्वांच्याच पसंतीस उतरत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या धुमाकूळ घालत आहे. लोक हा व्हिडिओ शेअर करण्यासोबतच यावर निरनिराळ्या कमेंटही करत आहेत. एका यूजरनं म्हटलं की हे दृश्य खरंच खूप मजेशीर आहे. तर, दुसऱ्या एका यूजरनं म्हटलं की दीर आणि वहिणीचं बॉन्डिंग पाहण्यासारखं आहे. याशिवाय इतरही अनेकांनी यावर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.