JOIN US
मराठी बातम्या / Viral / 'अरे रे, छप्पर उडतय'; उंच इमारतींच्या मधून सुरू होता प्रवास; चक्रीवादळाचा आणखी एक भीतीदायक VIDEO

'अरे रे, छप्पर उडतय'; उंच इमारतींच्या मधून सुरू होता प्रवास; चक्रीवादळाचा आणखी एक भीतीदायक VIDEO

तौत्के चक्रीवादळाचा भयावह परिणाम पाहायला मिळत आहे. याचा अंदाज या व्हिडिओमधून कळेल

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 मे: तौत्के चक्रीवादळाचा भयावह परिणाम पाहायला मिळत आहे. याचा अंदाज या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ मुंबई नजीकच्या कल्याण भागातील आहे. येथे उंच इमारतींच्या मधून आकाशात एक पत्रा उडताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून सध्याच्या परिस्थितीचा अंदाज लावू शकता. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की छप्पर उंच इमारतीच्या मधून उडत आहेत. हे पाहताना पत्रा कोणत्या गाडीवर किंवा माणसावर पडला तर काय होईल, अशी भीती वाटत राहते. आकाशातून हे पत्रे अत्यंत जलद गतीने इमारतीच्या समोर जाऊन जोरात आवाज करून पडतात. अद्याप या घटनेनंतर कोणतीही जीवितहानी झाल्याचं समोर आलेलं नाही.

संबंधित बातम्या

हे ही वाचा- चक्रीवादळाचे बळी, राज्यात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू, पुढील काही तास धोक्याचे! चक्रीवादळाची अपडेट -मरीन ड्राईव्ह वरून पेडर रोड काहीवेळ बंद करण्यात आला आहे. बाबुलनाथ आणि केम्स काॅर्नर परिसरांत पाणी साचल्याने रस्ता काही काळ बंद -चक्रिवादळाने रायगड जिल्ह्यातही मोठं नुकसान केलं आहे. महाड, श्रीवर्धन, म्हसळा, मानगाव, अलिबाग, रेवस, मांडवा आणि उरण परिसरात मोठी पडझड झाली आहे.  सध्या वातावरण निवळत चाललंय. मात्र चक्रीवादळाने मागे भयाण वास्तव सोडलंय. -ठाणे हाॅस्पिटलची कमान पडली. जोरदार वाऱ्याने कमान पडल्याचं सांगितलं जात आहे. छ. शिवाजी महाराज रुग्णालयाची कमान पडली असून सुदैवाने कोणतीही हानी झालेली नाही. पोलीस आणि ठाणे आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या