क्यूट व्हिडीओ
मुंबई 12 ऑक्टोबर : सोशल मीडियावर नेहमीच असे काही व्हिडीओ व्हायरल होत असतात, जे फारच मजेदार असतात. तर काही व्हिडीओंवरती विश्वास ठेवणं देखील कठीण आहे. येथे आपल्याला प्राण्यांपासून ते लोकांच्या सवयींपर्यंत सगळ्याच प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात. असा अनेक वर्ग आहे ज्यांना प्राण्यांचे व्हिडीओ पाहायला खूपच आवडतात. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. जो पाहून नक्कीच तुमच्या चेहऱ्यावर हसू उमटेल. पाणीपुरी आवडत नाही असे फारच कमी लोक असतील. लोकांना तुम्ही तुमचा आवडिचा पदार्थ कोणता असं विचारलात तर बरेच लोक तुम्हाला पाणीपुरी असंच उत्तर देतील. लोक पाणीपुरी गोड, मीडियम किंवा तिखट असे आपल्या चवीनुसार खातात. तसे पाहाता पाणीपुरीचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत. परंतू ज्यांना पाणीपुरी आवडते त्यांना तर कोणत्याही प्रकारची खायला आवडते. हे ही पाहा : मनीमाऊ ऑन मिशन, चिमुकली बाल्कनीजवळ येताच करु लागली अशी गोष्ट, Video पाहून तुम्ही कराल कौतुक पण माणसंच काय तर प्राण्यांना ही पाणीपूरी खूपच आवडते. हो हे खरंय… सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक हत्ती पाणीपुरी खातोय. हत्ती पाणीपुरी वाल्याच्या थेल्याजवळ आपल्या माणसांप्रमाणे उभा आहे आणि एका मागून एक पाणीपुरी तो आपल्या सोंडेमध्ये घेऊन खात चालला आहे. पाणीपुरी खाताना हत्तीला कसलं ही भान उरलेलं नाही. त्याची ही शैली फारच मजेदार आहे.
हे ही पाहा : कुत्र्याने वाघाच्या कानाचा घेतला चावा, पुढे जे घडलं त्यावर विश्वास ठेवणं कठीण, पाहा VIDEO हत्तीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोकांना हा व्हिडीओ खूपच आवडला आहे. अगदी लहान मुलांप्रमाणे हत्ती पाणीपुरी खाताना दिसत आहे. का क्यूट हत्ती लोकांच्या मनात घर करुन जात आहे. हा व्हिडीओ नक्की कुठला आहे हे ठावूक नाही, पण तो लोकांच्या मनात घर करुन जात आहे हे मात्र नक्की.