नवी दिल्ली 28 फेब्रुवारी : ज्याप्रमाणे सिंहाला जंगलाचा राजा म्हटलं जातं, तसंच मगरीलाही पाण्यातील राजा समजलं जातं. शिकारीच्या बाबतीच मगर सिंहापेक्षाही कमी नसते. आपल्या शिकारीला ती काही मिनिटांतच आपल्या जाळ्यात अडकवते. पाण्यात असताना मगर कधीकधी सिंहाचीही शिकार करते. मगरीच्या जबड्यातून सुखरूप परत येणं, जवळपास अशक्यच असतं. यासोबत मगर इतकी विशालकाय असते की शिकार लहान असेल तर ती थेट त्याला गिळूनच घेते. सध्या सोशल मीडियावर मगरीच्या शिकारीचा एक व्हिडिओ (Crocodile Attacks on Turtle) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हीही हैराण व्हाल.
या व्हिडिओमध्ये (Viral Video) दिसतं की मगरीने एका छोट्याशा कासवाची शिकार करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याला गिळून घेण्याचा प्रयत्न मगर करते. मात्र, यात ती अपयशी ठरते. कारण कासवाच्या पाठीवर असलेलं दगडासारखं कवछ मगर आपल्या धारदार दातांनीही तोडू शकत नाही. मगर भरपूर प्रयत्न करते, मात्र जेव्हा तिच्या लक्षात येतं की ती कासवाची शिकार करू शकत नाही तेव्हा त्याला जाऊ देते.
मगरीच्या तावडीतून सुटल्यानंतर कासवही तिथून हळूच निघून जातं. कदाचितच याआधी कधी तुम्ही मगरीला शिकारीच्या बाबतीच अशाप्रकारे माघार घेताना पाहिलं असेल. हा व्हिडिओ अतिशय हैराण करणारा आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हालाही वाटेल की मगर या कासवाला खाईल. मात्र शेवटी जे काही होतं त्याची कोणीच कल्पनाही केली नसेल, कदाचित स्वतः मगरीनेही.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ scienceturkiyeofficial नावाच्या अकाऊंटवरुन शेअऱ केला गेला आहे. आतापर्यंत 54 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर 2 हजारहून अधिकांनी लाईक केला आहे. व्हिडिओवर लोक निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिलं, अखेर मगरीच्या तावडीतून कासव वाचलंच. याशिवाय इतरही अनेकांनी यावर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.