JOIN US
मराठी बातम्या / Viral / VIDEO : पाण्यात मगर आणि विशालकाय अजगराची जबरदस्त फाईट; अनपेक्षित झाला लढाईचा शेवट

VIDEO : पाण्यात मगर आणि विशालकाय अजगराची जबरदस्त फाईट; अनपेक्षित झाला लढाईचा शेवट

सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ क्लिपमध्ये दिसतं की मगर अजगराची शिकार करण्याचा बेत आखते. यासाठी ती अजगराला आपल्या जबड्यात पकडण्यासाठी आणि मारण्यासाठी संपूर्ण ताकद लावते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 08 मे : सोशल मीडियावर अनेकदा प्राण्यांचे निरनिराळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यासोबतच मगरींचे व्हिडिओही अनेकदा पाहायला मिळतात. ज्याप्रमाणे सिंह जंगलाचा राजा असतो, तसंच मगर पाण्यातील, असं म्हटलं जातं. पाण्यात राहून मगरीशी पंगा घेणं म्हणजे स्वतःच्या मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे. अजगर आणि मगरीसारखे प्राणी आपल्या शिकारीला अगदी क्षणभरात गिळून घेतात. अशात जर हेच दोन्ही जीव एकमेकांसमोर आले तर? निश्चितच त्यांच्या जबरदस्त लढाई पाहायला मिळेल. चक्क रानडुकरांनी तोडले बिबट्याचे लचके; शिकारीचा हा VIDEO पाहून व्हाल अवाक सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडिओ (Crocodile and Python Fight Video) व्हायरल झाला आहे. यात एक मगर विशालकाय अजगराला आपली शिकार बनवण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसतं. मगरीचा जबडा हा जगातील सर्वात शक्तीशाली असल्याचं म्हटलं जातं. मगर एकच वार करून कोणत्याही प्राण्याची शिकार करू शकते आणि त्याला जिवंत गिळू शकते, असं म्हटलं जातं.

संबंधित बातम्या

सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ क्लिपमध्ये दिसतं की मगर अजगराची शिकार करण्याचा बेत आखते. यासाठी ती अजगराला आपल्या जबड्यात पकडण्यासाठी आणि मारण्यासाठी संपूर्ण ताकद लावते. यादरम्यान अजगरही आपला जीव वाचण्यासाठी प्रयत्न करताना दिसतो. अजगर स्वतःच्या बचावासाठी मगरीला आपल्या शरीराने गुंडाळताना दिसतो. छातीवर चढून श्वानाने मालकाला नदीच्या पाण्यात ढकललं; कॅमेऱ्यात कैद झाली घटना, पाहा VIDEO या लढाईदरम्यान मगरीलाही याची कल्पना येते की ती अजगराला सहज आपली शिकार बनवू शकत नाही. अशात मगर त्याच्या शिकारीचा प्लॅन रद्द करते आणि अजगराला आपल्या जबड्यातून सोडते. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर भरपूर व्हायरल होत आहे आणि अजगर मगरीची ही लढाई नेटकऱ्यांचं लक्षही वेधत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या