अहमदाबाद, 23 सप्टेंबर : सोशल मीडियावर प्राण्यांचे बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात गाय मजल्यावरून खाली उडी मारताना दिसते आहे. गायीची आत्महत्या म्हणून हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. पण खऱंच गायीने आत्महत्या केली का? या व्हिडीमागे नेमकी काय कहाणी आहे, यामागील सत्य काय आहे? जाणून घेऊयात. गायीच्या आत्महत्येच्या व्हिडीओमागील सत्य जाणून घेण्यापूर्वी आधी हा व्हिडीओ पाहा. नेमकं काय आणि कसं घडलं ते पाहुयात. व्हिडीओत पाहू शकता रस्त्याने गाड्या जाताना दिसत आहेत. त्याचवेळी कॅमेरा वरच्या दिशेने जातो. एका मजल्यावर एक गाय दिसते. बाल्कनीत ही गाय उभी आहे. आतून कुणाला तरी ती येताना पाहते आणि त्यानंतर तिथून पळ काढते ती मजल्यावरून उडी मारते. हे वाचा - Pitbull Dog Attack On Cow : पिटबुल डॉगने आता गायीलाही बनवली शिकार; श्वानाच्या भयंकर हल्ल्याचा VIDEO या गायीचं पुढे काय झालं ते या व्हिडीओत दिसत नाही. पण गायीने आत्महत्या केली म्हणून हा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. व्हिडीओ पाहताच क्षणी आपल्यालाही तसंच दिसून येतं. पण हा व्हिडीओ नेमका कुठला आहे आणि इथं नक्की घडलं तरी काय ते आता आपण पाहुयात.
हा व्हिडीओ आहे गुजरातच्या अहमदाबादमधील. महापालिकेची टीम रस्त्यावर अशा भटकणाऱ्या प्राण्यांना पकडते आहे. ही गायही अशीच रस्त्यावर फिरत होती. त्यावेळी महापालिका टीम तिला पकडायला गेली. या टीमपासून दूर पळत गाय या रस्त्याशेजारील दुकानाच्या मजल्यावर गेली. महापालिकेची टिमही तिला पकडण्यासाठी तिच्यामागोमाग मजल्यावर गेली. गाय बाल्कनीत गेली. आता तिथून तिला पळण्यासाठी दुसरी कोणताच मार्ग नव्हता. थोडा वेळ ती तिथं उभी राहिली. पण जशी महापालिकेची टीम तिच्या जवळ येऊ लागली तशी ती घाबरली आणि आपला जीव वाचवण्यासाठी म्हणून तिने थेट पहिल्या मजल्यावरून खाली उडी मारली. यामुळे आपल्याला किती दुखापत होईल याची कल्पना या मुक्या जीवाला नव्हती. हे वाचा - OMG! छोट्याशा कोळीने 20 पट मोठ्या पक्ष्याची केली शिकार; विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO माहितीनुसार गाय गंभीररित्या जखमी झाली आहे. तिला पशूवैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.