नवी दिल्ली 14 जून : सध्या इन्स्टाग्रामवर एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्या अंगावरही काटा येईल. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल की प्राण्यांपासून शक्य तितकं दूर राहाणंच योग्य आहे. अन्यथा याचे परिणाम अतिशय भयंकर होऊ शकतात. लेडी गँगची दहशत! चौघींकडून तरुणीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण, Video Viral काही सेकंदांच्या या व्हिडिओने नेटकऱ्यांच्याही काळजाचा ठोका चुकवला आहे. या व्हिडिओमध्ये (Cow Attack Video) एक गाय रस्त्यावरून जाताना दिसत आहे. यावेळी एक व्यक्ती आपल्या घराच्या गेटमधून बाहेर येतो आणि एक गाईला तिथून हकलवण्याचा प्रयत्न करतो. मात्र हा प्रयत्न त्याला किती महागात पडतो, हे तुम्ही सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये बघू शकता (Cow Attacked A Man).
हा व्यक्ती गाईला तिथून पुढे हकलण्याचा प्रयत्न करताना दिसतो. इतक्यात गाई अचानक मागे वळते आणि या व्यक्तीवर भयंकर हल्ला करते. गाय या व्यक्तीला आपल्या शिंगावर उचलून इतक्यात जोरात खाली आपटते की बराच वेळ हा व्यक्ती जागेवरुन हलूही शकला नाही. यानंतर या व्यक्तीच्या मदतीसाठी दुसरा एक व्यक्ती धावत तिथे येतो. यानंतर गाई तिथून निघून जाते. आता हा व्यक्ती इथून पुढे कोणत्याही प्राण्यासमोर जाण्याआधी दहावेळा विचार करेल. रिक्षातील महिलेच्या मांडीवरुन रस्त्यावर पडला चिमुकला; मागून वेगात आली बस अन्…, थरारक घटनेचा Live Video हा व्हिडिओ आतापर्यंत 5 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. तर अनेकांनी लाईकही केला आहे. बऱ्याच यूजर्सनी या व्हिडिओवर निरनिराळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. हा व्हिडिओ ही शिकवणही देऊन जातो की प्राण्यांना त्रास देण्याआधी एकदा विचार नक्की करा. अन्यथा ही चूक बरीच महागात पडू शकते.