JOIN US
मराठी बातम्या / Viral / अजब प्रकरण! घरात दररोज पडायचे गोल्फ बॉल; कोर्टात केस करताच करोडपती झालं हे जोडपं

अजब प्रकरण! घरात दररोज पडायचे गोल्फ बॉल; कोर्टात केस करताच करोडपती झालं हे जोडपं

अमेरिकेतील Massachusetts मध्ये राहणाऱ्या एरिक आणि एथिना या जोडप्याने करोडो रुपयांची गुंतवणूक करून एका सुंदर ठिकाणी स्वत:साठी घर खरेदी केलं. स्थलांतरानंतर काही दिवसांनी त्यांच्या घरात गोल्फचे चेंडू पडू लागले.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 27 एप्रिल : जेव्हा लोक स्वतःसाठी घर घेतात तेव्हा घरात शांतता आणि सुख असावं असा त्यांचा प्रयत्न असतो. एरिक आणि एथिना टेन्झार यांनीही असाच विचार केला आणि गोल्फ कोर्सजवळ त्यांचं स्वप्नातील घर घेतलं. मात्र, इथे रिलॅक्स होण्याऐवजी त्यांच्या घरात रोज काही ना काही तुटू लागलं. याचं कारण गोल्फ कोर्सवरून येणारे बॉल होते. मोठ्या तोऱ्यात एकाच मंडपात एकाच वेळी 9 बायकांशी केलं लग्न; महिनाभरातच… अमेरिकेतील Massachusetts मध्ये राहणाऱ्या एरिक आणि एथिना या जोडप्याने करोडो रुपयांची गुंतवणूक करून एका सुंदर ठिकाणी स्वत:साठी घर खरेदी केलं. आपल्या 3 लहान मुलांसोबत राहाण्यासाठी त्यांना ही जागा आवडली. स्थलांतरानंतर काही दिवसांनी त्यांच्या घरात गोल्फचे चेंडू पडू लागले. कधी त्यांच्या घराची खिडकी तुटलेली असायची तर कधी सरळ गोल्फचा चेंडू त्यांच्या घरासमोरील लॉनमध्ये पडायचा. या जोडप्याने या समस्येबद्दल आधी विचारही केला नव्हता. डेली स्टारच्या वृत्तानुसार, हे जोडपं घरात शिफ्ट झाल्यापासून आतापर्यंत घरातल्या गोल्फ कोर्समधून 700 गोल्फ बॉल त्यांच्या घरात पडले आहेत. त्यामुळे त्यांच्या घराला तडे गेले आहेत. इतकंच नाही तर गोल्फ बॉल घराच्या दार आणि खिडक्यांवर आदळल्यानंतर गोळी लागल्यासारखा आवाज यायचा. हद्द तर तेव्हा झाली जेव्हा या जोडप्याने घरातील एका भागात लहान मुलांना या बॉलपासून वाचवण्यासाठी डेक लावला. तरीही अखेर आवाजामुळे त्रस्त होऊन दाम्पत्याने हे प्रकरण न्यायालयात खेचलं. ‘जर भारत असता तर…’; पाकिस्तानातील 8 वर्षांच्या मुलाचा VIDEO पाहून भडकले नेटिझन्स डिसेंबरमध्ये प्लायमाउथ सुपीरियर कोर्टाने कुटुंबाला गोल्फ बॉलच्या आवाजामुळे झालेल्या मानसिक आणि भावनिक नुकसानासाठी आणि घराच्या नुकसानीसाठी £2.7 मिलियन म्हणजेच 25 कोटी रुपयांची भरपाई देण्याचा आदेश दिला (Couple Wins Millions Over Ball Bombardment). हा खटला 6 दिवस चालल्याने ही रक्कम व्याज लागू करून सुमारे £3.8 दशलक्ष म्हणजे सुमारे 37 कोटी सेट करण्यात आली. या जोडप्याचं म्हणणं आहे की, त्यांना या प्रकरणाबाबत प्रथम कंट्री क्लबशी बोलायचं होतं, परंतु परिस्थिती अशी बनली की त्यांना हे प्रकरण वकिलामार्फत कोर्टात न्यावं लागलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या