नाग-नागिणची जोडी
गौरव सिंह, प्रतिनिधी भोजपूर, 4 जुलै : बिहारच्या आरामध्ये श्रावण महिन्याच्या एक दिवस आधी नाग-नागिणची जोडी प्रेमात बुडालेली दिसली. नाग-नागिणीच्या प्रेमाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. श्रावणमध्ये अशाप्रकारे नाग आणि नागिणीचे हे स्वरुप पाहणे लोक शुभ मानत आहेत. हा व्हिडिओ आरामधील धोबी घाटातील पेट्रोल पंपाजवळचा आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये नाग-नागिणची जोडी एकमेकांना मिठी मारताना दिसत आहे. सुमारे तासभर नाग-नागिण जोडी अशीच आनंदाने डोलत असल्याचे घटनास्थळी उपस्थित लोकांनी सांगितले.
नेमकं काय घडलं - हे दृश्य पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. लोक कुतूहलाने या जोडप्याकडे पाहत होते. तसेच अनेक लोक त्यांच्या मोबाईलने या दृश्याचा व्हिडिओ बनवतानाही दिसले. आता यातील काही व्हिडिओ शिवभक्ती गीतांसह सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
यावेळी हे दृश्य पाहणारे लोक खूप रोमांचित झाले होते. लोकांचे म्हणणे आहे की, महादेवाला नाग आणि नागिण खूप प्रिय आहेत. त्यामुळे श्रावण महिन्यात हे दृश्य दिसणे निश्चितच काही शुभ संदेश येणे असा आहे. दरम्यान, जेव्हा सापाच्या या जोडीला त्यांच्या आजूबाजूच्या लोकांची उपस्थिती लक्षात आल्यावर ते जवळच्या बिळात घुसल्याचे दिसले.