JOIN US
मराठी बातम्या / Viral / Spy Camera: हॉटेलच्या रुममध्ये मिळाला छुपा कॅमेरा आणि कपलसोबत घडली धक्कादायक घटना

Spy Camera: हॉटेलच्या रुममध्ये मिळाला छुपा कॅमेरा आणि कपलसोबत घडली धक्कादायक घटना

रिपोर्टनुसार, एका आठवड्यानंतर दोघांनाही अचानक त्यांच्या बेडरूममध्ये एक विचित्र असं वेंटिलेशन ऑपवनिंग दिसलं आणि कहानी मध्ये ट्वीस्ट आलं

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई २० नोव्हेंबर : सध्याच्या काळात टेक्नोलॉजी फारच पुढे गेली आहे. ही खूप चांगली गोष्ट असली तरी देखील याचे परिणाम देखील फारच विचित्र होऊ लागले आहेत. आपल्याला तर हे माहित आहे की नाण्याला दोन बाजू असतात. तसंच काहीसं टेक्नोलॉजीच्या बाबतीत घडलं असावं, असं म्हणायला काहीच हरकत नाही. म्हणून टेक्नोलॉजीच्या फायद्यासोबतच त्याचे नुकसान समोर आले आहेत. अलीकडेच कॅमेराच्या माध्यमातून काही अक्षेपार्य गोष्टी रेकॉर्डकरुन त्या समोर आणल्या असल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या आहेत. यामध्ये हॉटेल रुममध्ये काही मुलांचे किंवा कपलचे व्हिडीओ घेऊन त्या व्हिडीओना सोशल मीडियावर टाकून पैसे कमावनं किंवा लोकांना धमकावून त्यांच्याकडून पैसे लुटण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. हे ही पाहा : हॉटेल रुममध्ये लावलेला छुपा कॅमेरा शोधून काढण्यासाठी वापरा ‘या’ ट्रिक्स असेच एक प्रकरण समोर आले आहे जेव्हा एका जोडप्याला हॉटेलच्या बेडरूममध्ये छुपा कॅमेरा सापडला होता. वास्तविक, ही घटना ब्राझीलमधील एका हॉटेलमधील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऍना लुसिया आणि ज्युलिया स्टोपा नावाचं कपल सुट्टीसाठी गेलं होतं. त्यांनी ब्राझीलहून रिओ दि जानेरोला जाण्याचा प्लॅन तयार केला आणि मग त्यासाठी हॉटेलही बुक केले. पण त्यांना काय माहीत, त्याच्यावर कोणीतरी नजर ठेवून बसलंय. रिपोर्टनुसार, एका आठवड्यानंतर दोघांनाही अचानक त्यांच्या बेडरूममध्ये एक विचित्र असं वेंटिलेशन ऑपवनिंग दिसले. त्यांनी जेव्हा जवळ जाऊन पाहिलं. शेवटी त्यांनी त्यांच्या फोनचा फ्लॅश त्या छिद्रावर धरला जिथे अचानक कॅमेरा लेन्सच्या रूपात फ्लॅश दिसला. एवढेच नाही तर या लेन्ससोबत त्याला एक केबलही दिसलं. या घटनेनंतर कपलला धक्काच बसला. त्यांना आधी काय करावे ते सुचेचना अखेर, त्यांनी पोलिसांना फोन करुन बोलावले. पोलिस येताच एकच खळबळ उडाली आणि शेवटी जेव्हा ते उपकरण काढून टाकले, तेव्हा प्रत्यक्षात तो कॅमेरा होता हे लक्षात आलं. सध्या हॉटेलने याबाबत निश्चितपणे स्पष्टीकरण दिले असले तरी त्याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तुम्ही देखील हॉटेलमध्ये सुट्टीसाठी जात असाल, तर खबरदारी नक्की घ्या आणि रुमचा एकदा चांगला तपास घ्या. जेणेकरुन तुम्ही अशा गोष्टींना बळी पडणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या