JOIN US
मराठी बातम्या / Viral / आता कोरोनासमोर झुकायचं नाही, त्याला झुकवायचं! हा PHOTO पाहून वाढेल तुमचं मनोबल

आता कोरोनासमोर झुकायचं नाही, त्याला झुकवायचं! हा PHOTO पाहून वाढेल तुमचं मनोबल

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोनं दाखवून दिलं, कोरोना भारताला कधीच हरवू शकणार नाही

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 25 एप्रिल : कोरोनाव्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. कोरोनापुढे अनेक देशांनी गुडघेही टेकले आहे. भारतातही कोरोनाचा प्रसार वाढत आहे, मात्र या सगळ्या आव्हानांवर भारत मात करण्यास सज्ज आहे. कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी जाहीर करण्यात आलेला लॉकडाऊन भारतासाठी फायद्याचा ठरताना दिसत आहे. असे असले तरी सध्याच्या परिस्थितीत संयम तुटणं स्वाभाविक आहे, मात्र तुमचा मनोबल वाढवणारा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये एक महिला आपल्या चिमुरड्यासोबत कोरोनाला मातवर करण्यासाठी सज्ज असल्याचे दाखवून देत आहे. या दोघांनी या आपल्या तोंडावर झाडांची पानं लावली आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मास्कचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळं तोंडावर पान लावणाऱ्या या दोघांच्या फोटोनं नक्कीच भारतीयांना एक आशा दिली आहे. वाचा- काम करता करता पोलिसांनी सुरु केला डान्स, कोरोना योद्ध्यांचा VIDEO VIRAL

वाचा- लॉकडाऊनमध्ये चिमुकलीचा पहिला बर्थडे पोलिसाने बनवला खास, पाहा VIDEO या फोटोवर लोकांनी, निदान गरीबांना याची जाणीव आहे, तेच लॉकडाऊनचं काटेकोरपणे पालन करत असल्याचे मत व्यक्त केले आहे. या फोटोमधून कोरोनासमोर झुकायचं नाही तर त्याला झुकवायचं अशा भावनाही काहींनी व्यक्त केल्या आहेत.

संबंधित बातम्या

वाचा- माणुसकीचा पाझर, हात नसलेल्या माकडाला पोलीस अधिकारी भरवतोय केळ, VIDEO VIRAL

जाहिरात
जाहिरात

वाचा- काय सुरू आणि काय असणार बंद यावर गोंधळू नका, इथे वाचा सविस्तर बातमी दरम्यान, हा फोटो कुठला आहे हे अद्याप कळू शकले नाही आहे. पण या फोटोतून भारत कोरोना समोर गुडघे टेकणार नाही तर, त्याला नमतं घेण्यास भाग पाडेल, ही भावना नक्की मनात येते. संपादन-प्रियांका गावडे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या