न्यूयॉर्क, 22 एप्रिल : कोरोनामुळे जवऴजवळ संपूर्ण जग लॉकडाऊन झाले आहे. त्यामुळे लोकं आपापल्या घरात कैद आहेत. अशा परिस्थितीत काहींना घराबाहेर पडण्याचा मोह नक्कीच होतो. असाच काहीसा विचित्र प्रकार अमेरिकेत घडला. एक इसम येथील बंद हॉटेलमध्ये शिरला आणि चार दिवस आतच राहिला. या 4 दिवसांत त्यानं हॉटेलमधील सर्व दारू फस्त केली. दरम्यान सुरक्षा कर्मचाऱ्यांना शंका आल्यानंतर त्यांनी दारू पिताना या इसमाला पकडले. अमेरिकेतील न्यू हेव्हन पोलीस स्थानकाने एका इसमाला अटक केली. याचे नाव लुइस एजेंल आहे. जेव्हा पोलिसांनी या इसमाला अटक केली, तेव्हाही तो दारूच पित होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या इसमाने जवळजवळ 70 दारूच्या बाटल्या फस्त केल्या. लॉकडाऊनमुळे हॉटेल बंद करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत लुइस हॉटेलच्या मागच्या दरवाज्यानं आत शिरला. यावेळी हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून सुरक्षा रक्षकांना याची माहिती मिळाली. त्यांनी पोलिसांना याबबात माहिती दिली. वाचा- पाण्यापासून दारूपर्यंत सगळं फ्री तेही घरपोच! संगीत दिग्दर्शकाची अनोखी सेवा दरम्यान पोलिसांनी लुइसला नुकसानभरपाई करण्यास सांगितले आहे. हॉटेलच्या मालकानं दिलेल्या माहितीनुसार जवळजवळ 70 दारूच्या बाटल्या गायब झाल्या आहेत. वाचा- VIDEO : पुणे सीलबंद केल्यानंतर पोलिसांचं आक्रमक रूप, भर चौकात केली धुलाई पाण्यापासून दारूपर्यंत सगळं फ्री तेही घरपोच! नेदरलँड्समध्ये राहणाऱ्या एका युवकाने लोकांना लॉकडाऊनमध्ये मदत करण्याची सेवा सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी त्याने एका दुकानात लोकांच्या लांबच लांब रांगा पाहिल्या होत्या. हे दुकान होते व्हाइन शॉप. दारू विकत घेण्यासाठी लोकांनी केलेली गर्दी पाहून, त्यानं लोकांना घरपोच दारूसह खाण्याचे पदार्थ मोफत देण्याची सोय केली आहे. लोकांना ही सेवा पुरवणारा एक संगीत दिग्दर्शक असून आपल्या बॅंडसह तो लोकांना मदत करत आहे. फ्री आयसोलेशल व्हॅन, असे लिहिलेल्या गाडीतून तो सामानाची विक्री करतो. मुख्य म्हणजे हे सामना तो घरपोच आणि विनामुल्य विकतो. वाचा- बाल्कनी, एक चिठ्ठी आणि लॉकडाऊन! पहिल्या नजरेत तरुणी घायाळ, असा सुरू झाला रोमान्स