JOIN US
मराठी बातम्या / Viral / इंजेक्शनच्या भीतीने पळत सुटले आजोबा; मग नर्सने काय केलं ते तुम्हीच पाहा VIDEO

इंजेक्शनच्या भीतीने पळत सुटले आजोबा; मग नर्सने काय केलं ते तुम्हीच पाहा VIDEO

इंजेक्शनच्या भीतीने आजोबा नर्सपासून दूर पळाले खरे पण…

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 जून : सध्या देशभरात कोरोना लस (Corona vaccine) दिली जाते आहे. सध्या तरी ही लस इंजेक्शनमार्फतच (Injection) दिली जाते आहे. इंजेक्शन म्हटलं की फक्त लहान मुलांनाच नाही तर मोठ्यांनाही भीती वाटते. कोरोना लसीकरणादरम्यानही (Corona vaccination) सोशल मीडियावर (Social media) असे बरेच व्हिडीओ व्हायरल (Viral video) झाले, ज्यात कोरोना लस घेताना लोकांना इंजेक्शनची भीती वाटत होती. कोरोना लसीकरणादरम्यान असाच एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यात एक आजोबा इंजेक्शनला घाबरून पळाले पण नर्सने त्यांना इंजेक्शन दिलंच आणि ते कसं ते तुम्हीच पाहा. कोरोना लसीकरण सुरू असताना आयपीएस अधिकारी रूपिन शर्मा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यांना लशीची भीती वाटते, त्यांच्यासाठी हा व्हिडीओ आहे, असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे.

संबंधित बातम्या

व्हिडीओत पाहू शकता एक आजोबा बेडवर बसलेले आहेत. नर्स त्यांना इंजेक्शन देण्याच्या तयारीत आहे. आजोबा ते इंजेक्शन बघून इतके घाबरतात की आपण इंजेक्शन घेणार नाही, असं म्हणतच ते बेडवरून उठताना दिसतात. नर्स सुरुवातीला त्यांच्याकडे पाहतच राहते. नंतर आजोबा जसे पाठमोरे होतात, तसं नर्स इंजेक्शन त्यांच्याकडे फेकते. इंजेक्शन बरोबर आजोबांच्या पार्श्वभागावर जाऊन बसतं. त्यानंतर आजोबा नर्सच्या दिशेने वळतात. इतक्यात एक व्यक्ती मागून येते आणि दरवाजा उघडते. तेव्हा आजोबांच्या मागे असलेल्या इंजेक्शनवर दाब पडतो आणि इंजेक्शन आजोबांना टोचलं जातं. हे वाचा -  VIDEO: योगा करणाऱ्या व्यक्तीसोबत तरुणीनं अचानक केलं असं काही, पाहून बसेल धक्का हा मजेशीर व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत. तुमच्याही ओळखीत कुणी अशी इंजेक्शनला घाबरणारी व्यक्ती असेल तर मजा म्हणून त्या व्यक्तीसोबत ही बातमी नक्की शेअर करा आणि त्यांची काय प्रतिक्रिया येते ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या