नवी दिल्ली 23 ऑक्टोबर : सोशल मीडियावर (Social Media) अनेकदा असे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होतात, जे हैराण कऱणारे असतात. अनेकदा हे फोटो काही लोकांच्या भावना दुखावणारेही असतात. यामुळे वादही सुरू होतात. कधीकधी लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी स्वतःलाच या वादात अडकवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, अनेकदा याचे परिणाम भलतेच होतात आणि त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. नुकतंच एका अॅडल्ट स्टारसोबतही (Adult Star) असंच झालं. तिच्या फोटोमुळे वादाला सुरुवात झाली आणि अखेर तिला लोकांची माफी मागावी लागली.
या राजानं 5000 महिलांसोबत ठेवले संबंध; जनताही कंटाळली, अखेर केलं हे काम
पॉर्न अभिनेत्री (Porn Actress) आणि अॅडल्ट सब्सक्रिप्शन साईट ओनलीफॅन्सची मॉडेल लोला बनी सध्या चर्चेत आहे. कारण तिचा एक विवादित व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. लोला बनीचा एक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत आहे, ज्यात ती रशियाच्या सेंट बेसिल चर्चच्या बाहेर उभा असल्याचं दिसतं. व्हिडिओमध्ये ती अश्लील पोज (Bold Pose) देताना दिसते. तिचा हा व्हिडिओ पाहून रशियामधील ख्रिश्चन लोक नाराज झाले आणि तिला जीवे मारण्याची धमकी देऊ लागले. अभिनेत्री स्वतःही रूमी मॉडेल असल्यामुळे तिला लोकांच्या टीकेचा सामना करावा लागला. व्हिडिओ व्हायरल होऊन धमक्या मिळाल्यानंतर लोलानं आपली चूक मान्य करत सोशल मीडियावर माफी मागितली. आरटी वेबसाईटच्या वृत्तानुसार, लोला बनीने सोशल मीडियावर लिहिलं, मी लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. यासाठी मी माफी मागते. मात्र हा व्हिडिओ काही वर्षांपूर्वीचा असल्याचंही तिनं सांगितलं.
पोप फ्रान्सिस यांच्या टोपीवर डोळा; मुलाने भर कार्यक्रमातच काय केलं पाहा VIDEO
मॉस्कोमधील अभिनेत्रीनं चर्चसमोर असं काही केल्याची ही पहिलीच वेळ नाही. तजाकिस्तानची व्हिडिओ ब्लॉगर रसलाम बोबीवनंही नुकतंच असंच केलं होतं, यामुळे मोठा वाद सुरू झालेला. रसलानने याच चर्चच्या बाहेर उभा राहात एका महिलेसोबत अश्लील फोटो काढला होता. या फोटोत महिलेनं एक जॅकेट घातलं होतं, ज्याच्या मागे पोलीस असं लिहिण्यात आलं होतं. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी रसलानला ताब्यातही घेतलं होतं आणि दहा दिवस तुरुंगवासाची शिक्षाही सुनावली होती.