JOIN US
मराठी बातम्या / Viral / 16 वर्षाच्या विद्यार्थ्यावर शिक्षिकेचं जडलं प्रेम; दोघांनी उचललं असं पाऊल की पालकही हैराण

16 वर्षाच्या विद्यार्थ्यावर शिक्षिकेचं जडलं प्रेम; दोघांनी उचललं असं पाऊल की पालकही हैराण

शिक्षिका आणि विद्यार्थ्याची अजब प्रेमकहाणी समोर आली आहे. यूपीच्या नोएडामध्ये एक शिक्षिका प्रेमात इतकी वेडी झाली की ती तिच्या 16 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्यासह पळून गेली.

जाहिरात

फाईल फोटो

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लखनऊ 18 जानेवारी : शिक्षिका आणि विद्यार्थ्याची अजब प्रेमकहाणी समोर आली आहे. यूपीच्या नोएडामध्ये एक शिक्षिका प्रेमात इतकी वेडी झाली की ती तिच्या 16 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्यासह पळून गेली. आता विद्यार्थ्याच्या वडिलांनी सेक्टर 113 पोलीस ठाण्यात शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत. चालत्या स्कूटीवरच कपलचा रोमान्स, बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसून रस्त्यावरच तरुणीचे अश्लील चाळे, VIDEO VIRAL मिळालेल्या माहितीनुसार, सेक्टर 123 मधील 22 वर्षीय शिक्षिका घरी मुलांच्या ट्यूशन घेते. शिक्षिकेच्या घरासमोर 16 वर्षांचा एक मुलगा राहतो. असं सांगितलं जात आहे की, अल्पवयीन मुलगा ट्यूशनसाठी शिक्षिकेकडे जात असे. यादरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढली आणि दोघंही एकमेकांना पसंत करू लागले. रविवारी दोघेही घरातून पळून गेल्याचा आरोप आहे. विद्यार्थ्याचे वडील मूळचे देवरियाचे आहेत. मुलाच्या वडिलांनी आपल्या तक्रारीत म्हटलं की, त्यांचा 16 वर्षीय मुलगा रविवारी दीडच्या सुमारास मावशीच्या घरी जात असल्याचे सांगून घरातून निघून गेला, मात्र रात्रीपर्यंत तो परतला नाही. समोर राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणीने आपल्याला मुलाला फूस लावल्याचं अल्पवयीन विद्यार्थ्याच्या वडिलांनी पोलिसांना सांगितलं. मुलाच्या वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. लग्नात तरुणाने नवरी-नवरदेवाच्या अंगावरच मारली उडी; पुढं जे केलं ते पाहून व्हाल हैराण…VIDEO या प्रकरणाबाबत अतिरिक्त डीसीपी आशुतोष द्विवेदी यांनी सांगितलं की, ‘तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती मिळाली आहे की, मुलगा या तरुणीकडे शिकायला जात असे. दोघंही रिलेशनशिपमध्ये असल्याचंही समोर आलं आहे. लवकरच दोघांचाही शोध घेतला जाईल.’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या