रडत रडत मुलीने शेअर केला व्हिडीओ कारण...
मुंबई, 11 डिसेंबर : सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. सेलिब्रिटी, मोठी माणसंचं नव्हे तर अगदी लहान लहान, चिमुकली मुमुलंही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहेत. लहान मुलांचे असे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. अशाच एका चिमुकलीच्या व्हिडीओने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या मुलीसोबत असं काही घडलं आहे की तिने रडत रडतच आपला हा व्हिडीओ बनवला आहे आणि सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. आपल्याला खूप वेदना होत असल्याचं ही चिमुकली या व्हिडीओत सांगते. या मुलीने एक प्रयोग केला आहे. जो तिच्या अंगलट आला आहे. त्यानंतर तिला इतक्या वेदना होत आहेत की तिच्याने त्या सहन होत नाही आहेत. आपल्या या वेदना तिने सोशल मीडियावर मांडल्या आहेत आणि जी चूक आपण केली ती इतरांनी करू नये, असं आवाहन तिने केलं आहे. असं या मुलीसोबत नेमकं घडलं तरी काय हे पाहण्याची इच्छा आता तुम्हालाही असेल. हे वाचा - पालकांनो Alert! मोबाईल घेईल तुमच्या चिमुकल्यांचा जीव; 13 वर्षांच्या मुलासोबत भयानक घडलं व्हिडीओत पाहू शकता केस मोकळे सोडलेली आणि केसात कंगवा असलेली ही मुलगी. तिच्या डोळ्यातून पाणी येतं आहे. ती ढसाढसा रडते आहे. ती इतकी रडली आहे की तिचे डोळे, चेहराही सूजलेला दिसतो आहे. तुम्ही व्हिडीओ नीट पाहिला तर मुलीचे केस त्या कंगव्यात अडकलेले दिसत आहेत. आता मुलगी नेमकं काय सांगते ते ऐका. मुलीने सांगितल्यानुसार तिला केस कुरळे करायचे होते. एक व्हायरल व्हिडीओ पाहून तिने तो प्रयोग स्वतःवर करून पाहण्याचा प्रयत्न केला. कंगव्याने ती केस कुरळे करायला गेली. केस कुरळे झाले नाहीतच पण ते कंगव्यात अडकले. ते अशा पद्धतीने अडकले की निघता निघेना. त्यामुळे मुलीला वेदनाही होऊ लागल्या. तरी तिने रडत रडत आपला व्हिडीओ बनवला. हे वाचा - शाळकरी मुलांना स्टंटबाजी पडली महागात, अंगाला आग लागली आणि… ज्यात ती सांगते, मित्रांनो पाहा माझे केस कंगव्यात अडकले आहेत. आता हे निघणार नाहीत. एकतर केस कात्रीने कापावे लागतील किंवा कंगवा कापावा लागेल. खूप वेदना होत आहेत. कृपया तुम्ही असं काही करण्याचा प्रयत्न करू नका.
चिमुकलीचा असं रडताना पाहून आपल्याला वाईटही वाटतं पण त्याचवेळी हसूही येतं. हा व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे माहिती नाही. @Gulzar_sahab ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ‘Guys आता काय करू?’, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमची काय प्रतिक्रिया आहे ती आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये द्या.