JOIN US
मराठी बातम्या / Viral / कोंबड्यालाही लागली दारूची चटक; पाण्याच्या ग्लासकडे ढुंकूनही पाहेना; Video viral

कोंबड्यालाही लागली दारूची चटक; पाण्याच्या ग्लासकडे ढुंकूनही पाहेना; Video viral

कोंबड्यालाही सोडवेना दारू.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 ऑगस्ट : एकदा दारू (Daaru) प्यायली की बहुतेकांना त्याची चटक लागते. मग अमूक एका वेळेला त्यांना दारू (Alcohol) लागतेच. बरं फक्त माणसंच नाही तर कोंबड्यालाही दारूची (Cock drinking alcohol) अशीच चटक लागली आहे. दारू पिणाऱ्या कोंबड्याचा (Cock drinking) व्हिडीओ (Viral video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होतो आहे. जो पाहून हैराण व्हाल. दारू ही अशी आहे की एकदा कुणी त्याच्या आहारी गेलं की सुटता सुटणं मुश्किल आहे. एका व्यक्तीने चक्क कोंबड्यालाही दारू पाजली आणि मग काय कोंबड्यालाही दारूशिवाय दुसरं काहीच नकोसं झालं.

संबंधित बातम्या

व्हिडीओत पाहू शकता, या व्यक्तीने कोंबड्याला आपल्या मांडीवर घेतलं आहे. सुरुवातीला या कोंबड्याला एका ग्लासमधून दारू दिली जाते. कोंबडा ग्लासात आपली चोच टाकून दारू पितो. त्यानंतर ज्या व्यक्तीच्या मांडीवर हा कोंबडा बसला आहे, त्याच्या हातात पाण्याचा ग्लास आहे. ती व्यक्ती कोंबड्याजवळ पाण्याचा ग्लास नेते. कोंबडा आपलं तोंड त्या ग्लासाजवळ नेतो. पण तो लगेच मागे घेतो. कदाचित त्याला त्या ग्लासातून दारूसारखा वास येत नाही, त्यामुळे तो ते पित नाही. हे वाचा -  एका माशाने मच्छीमार झाला लखपती, जाळ्यात सापडला 22 किलोचा मासा, VIDEO पुन्हा या कोंबड्यासमोर दारूचा ग्लास आणला जातो. तो त्या ग्लासमध्ये आपलं डोकं टाकून चोचीने घटाघट दारू पितो. मग पाण्याचा ग्लास दिसताच तो सरळ सरळ तोंडच फिरवतो. त्या पाण्याच्या ग्लासकडे ढुंकूनही पाहत नाही. असं एकदा दोनदा नाही किती तरी वेळा पाहायला मिळतं. हे वाचा -  Yuck! चिनी लोक चक्क लघवीत उकडतात अंडी; आवडीने खातात Virgin egg डिश आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी आपल्या ट्विटरवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या