JOIN US
मराठी बातम्या / Viral / Overbridge Stunt Video: ब्रिजवर सायकल घेऊन चढला, उतरताना झाली भयाण अवस्था

Overbridge Stunt Video: ब्रिजवर सायकल घेऊन चढला, उतरताना झाली भयाण अवस्था

इंटरनेटच्या जगात लोक प्रसिद्ध होण्यासाठी अनेक विचित्र गोष्टी करतात. सोशल मीडियावर अनेक लोकांचे धोकादायक स्टंटही समोर येत असतात. दिवसेंदिवस तरुणाई जास्त स्टंटकडे वळत चालल्याचं दिसत आहे.

जाहिरात

ब्रिजवर सायकल घेऊन चढला

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 07 जून : इंटरनेटच्या जगात लोक प्रसिद्ध होण्यासाठी अनेक विचित्र गोष्टी करतात. सोशल मीडियावर अनेक लोकांचे धोकादायक स्टंटही समोर येत असतात. दिवसेंदिवस तरुणाई जास्त स्टंटकडे वळत चालल्याचं दिसत आहे. लोक कुठे काय स्टंट करतील काही अंदाज लावता येत नाही. आपण विचारही करु शकत नाही असे धोकादायक स्टंट लोक करताना पहायला मिळतात. असे व्हिडीओ सोशल मीडियावर लगेच चर्चत येतात. नुकताच इंटरनेटवर एक स्टंट व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक तरुण ब्रिजवरुन सायकल घेऊन चालल्याचं थरराक दृश्य पहायला मिळत आहे. लोक काहीतरी हटके, विचित्र करण्याच्या नादात स्वतःचा जीवही धोक्यात घालतात. आपण काय करतोय याचा जीवावर काय परिणाम होईल याचा साधा विचारही करत नाही. असाच काहीसा प्रकास सध्या समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्याच्या एक साईड ते दुसऱ्या साईडपर्यंत जाण्यासाठी एक ब्रिज आहे. लोक या ब्रिजवरुन ये जा करत आहेत. मात्र एक पठ्ठ्या चक्क बिजवर सायकल घेऊन चढला आहे. तो सायकल घेऊल ब्रिजवर असलेल्या पत्र्यावरुन चालत आहे. हा धक्कादायक व्हिडीओ पाहून अंगावर काटा येत आहे. रस्त्याच्या साईडने लोक उभं राहून हा सर्व खेळ पाहत आहे. हा तरुण खाली कसा उतरणार याचीच चिंता सर्वांना लागल्याचं दिसतंय. मात्र व्यक्ती धाडसाने त्या पत्र्यावरुन चालत खालच्या दिशेने सायकल घेऊन येत आहे. तरुण उतरताना त्याच्यासोबत पाहणाऱ्यांचेही श्वास रोखले असल्याचं दिसून येतंय.

संबंधित बातम्या

यामध्ये पुढे काय घडतं हे व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलं नाही. हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ @giedde नावाच्या इन्स्ट्ग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओवर भरपूर कमेंट येताना दिसत आहे. असे धोकादायक स्टंट समोर येण्याची ही पहिलीच वेळ नाहीये यापू्र्वीही लोकांचे असे अनेक भयानक, धोकादायक, मजेशीर स्टंट व्हिडीओ समोर आले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या